गेल्या महिन्यात गूगल च्या आगामी स्मार्टफोन पिक्सल 3एक्सएल बद्दल एक लीक समोर आला होता ज्यात फोन च्या नॉच डिस्प्ले व काही स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली होती. आता पुन्हा एकदा गूगल पिक्सल 3एक्सएल ची चर्चा सुरू झाली आहे. एका नवीन लीक मधून या स्मार्टफोन चे फोटोज शेयर करण्यात आले आहेत. पिक्सल 3एक्सएल फोटो वरून फक्त फोनच्या डिस्प्ले आणि डिजाईन ची माहिती मिळाली नाही तर फोन चे स्पेसिफिकेशन्स पण समजले आहेत.
एक्सडीए डेवलेपर्स ने आपल्या रिपोर्ट मध्ये गूगल पिक्सल 3एक्सएल चे फोटोज शेयर केले आहेत जे डॉक्टर गुरु कडून आले आहेत. या रिपोर्ट मध्ये फोन चे फ्रंट, बॅक व साईड पॅनल दाखवण्यात आले आहेत. फोन ची डिजाईन डिटेल्स पाहण्याआधीच याचा फर्स्ट लुक पण खुप आर्कषक वाटतो. या रिपोर्ट मध्ये पिक्सल 3एक्सएल सफेद रंगात दाखवण्यात आला आहे. या संपुर्ण व्हाईट कलर वेरिएंट मध्ये फोन च्या उजव्या पॅनल वर आॅरेंज कलर पावर बटन आहे जो आकर्षित करतो.
गूगल पिक्सल 3एक्सएल च्या फोटो वरून समजते की कंपनी यात नॉच डिस्प्ले देऊ शकते. फोन डिस्प्ले च्या खालच्या बाजूला बेजल्स आहेत तिथे स्पीकर दिसत आहे. फोन च्या नॉच मध्ये दोन सेंसर दिसत आहेत जे कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतात. फोन च्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन खाली आहे. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगल चा लोगो आहे. तसेच खालच्या बाजूच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे. समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये फोन फास्टबूट मोड मध्ये आणून याचा फोटो क्लिक करण्यात आला आहे. बूट मधून समोर आले आहे की पिक्सल 3एक्सएल च्या या फोन मध्ये वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
गूगल च्या या फोन मध्ये क्वालकॉम चा सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट मिळणार असल्याचे स्पष्ट आले आहे. टेक विश्वात चर्चा सुरू आहे की गूगल आपल्या पिक्सल सीरीज चा आगामी स्मार्टफोन पिक्सल 3एक्सएल 6जीबी रॅम वर पण सादर करू शकते ज्यात 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. पण फोनच्या ठोस माहिती साठी गूगल च्या घोषणेची वाट बघितली जात आहे.