शाओमी-सॅमसंगची झोप उडवण्यासाठी अँड्रॉइडचा बादशहा भारतात; शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 6a लाँच

big billion days sale google pixel 6a price offer india

Google ची Pixel स्मार्टफोन सीरिज म्हणजे सच्चा अँड्रॉइड फोन. कोणत्याही अनावश्यक अ‍ॅप्सविना येणार क्लीन युआय अनेकांना आवडतो. तसेच पिक्सल स्मार्टफोनच्या कॅमेरा परफॉर्मन्सला तोड नाही, असं देखील पिक्सल युजर्स म्हणतात. असे ट्रू अँड्रॉइड एक्स्पीरियंस देणारे हे फोन भारतात मात्र जास्त येत नाहीत. परंतु आता Google Pixel 6a स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. दोन वर्षानंतर गुगलला भारतीयांची आठवण झाली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी जागतिक बाजारात आलेला हा हँडसेट आता भारतात लाँच करण्यात आला आहे.

गुगलच्या या फोनची प्री-बुकिंग आता भारतात देखील सुरु झाली आहे. Google Pixel 6a कंपनीनं गेल्यावर्षी लाँच केलेल्या Pixel 5a चा हा उत्तराधिकारी आहे जो भारतात लाँच करण्यात आला नव्हता. याआधी कंपनीनं भारतात साल 2020 मध्ये Pixel 4a सादर केला होता. नवया Google Pixel 6A स्मार्टफोनमध्ये कंपनीचा Tensor प्रोसेसर देण्यात आला आहे, जो गुगलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये देखील मिळतो. गुगलच्या या फोनला भारतात OnePlus 10R, Nothing Phone (1), आणि Realme GT सीरीज कडून थेट टक्कर मिळणार आहे.

Google Pixel 6a ची किंमत

Google Pixel 6a स्मार्टफोन भारतात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनची भारतात किंमत 43,999 रुपये आहे, जो चारकोल (ब्लॅक) आणि चाक (व्हाईट) कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. या फोनचा सेज (ग्रीन) कलर ऑप्शन भारतात लाँच करण्यात आला नाही. फोनची भारतात विक्री 28 जुलैपासून केली जाईल परंतु प्री-बुकिंग फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे.

लाँच ऑफर्स अंतर्गत Axis बँकेच्या कार्ड आणि EMI ट्रँजॅक्शनवर 4000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. जुन्या पिक्सल फोनवर 6000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. तसेच जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 2000 रुपयांची सूट मिळवता येईल. Pixel 6a विकत घेतल्यास Google Nest Hub Gen2/Pixel Buds A Series/ Fitbit Inspire 2 फक्त 4,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. YouTube Premium आणि Google One चे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक दिला जाईल. तसेच निवडक कार्डवर नो कॉस्ट EMI ऑफर देखील देण्यात आली आहे.

Google Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 3 च्या प्रोटेक्शनसह येतो. Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12.2MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा कॅमेरा सेटअप OIS आणि EIS ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4K 60FPS व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते.

हा फोन Android 12 OS सह सादर करण्यात आला आहे. गुगलचा हा फोन कंपनीच्या Tensor प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G78 GPU देण्यात आला आहे. यात 6GB LPDDR5 RAM, आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 4306mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

गुगलच्या या फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पिकर, ड्युअल मायक्रोफोन आणि नॉइज इंप्रीसनसह सादर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2 LE, GPS, NFC आणि USB Type C पोर्ट देण्यात आला आहे. यात Titan M2 सिक्योरिटी चिप देखील देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here