Google Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro Fold ची डिझाईन ब्रँडने केली शेअर, पाहा कसा आहे लूक

गुगलने आपल्या पिक्सल 9 सीरीजचे नवीन स्मार्टफोन Google Pixel 9 Pro आणि Google Pixel 9 Pro Fold चे लाँच कंफर्म केले आहे. या ब्रँडद्वारे आयोजित वर्षाच्या मोठ्या हार्डवेअर कार्यक्रमामध्ये 13 ऑगस्टला ग्लोबली एंट्री घेईल. तसेच, दुसऱ्या दिवशी भारतात 14 ऑगस्टला सादर होईल. या नवीन टिझरमध्ये फोनची डिझाईन पण दर्शविली गेले आहे. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.

Google Pixel 9 Pro ची डिझाईन

गुगलच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्युबवर पिक्सल 9 प्रो ओर पिक्सल 9 प्रो फोल्डचा व्हिडिओ टिझर समोर आला आहे.

  • तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की डिव्हाईसला Porcelain (पांढऱ्या) कलर पर्यायामध्ये दर्शविण्यात आले आहे.
  • फोनच्या बॅक पॅनलवर पिल शेप कॅमेरा माड्यूल मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो.
  • कॅमेरा माड्यूलकडे एलईडी फ्लॅश आणि टेंपरेचर सेन्सर लावला आहे.
  • फोनच्या उजव्या साईडवर पावर आणि वॉल्यूम बटन पाहायला मिळतात. तसेच मागील बाजूस गुगलची ब्रँडिंग दिसत आहे.

Google Pixel 9 Pro Fold डिझाईन

  • गुगल पिक्सल 9 प्रो फोल्डला टिझर व्हिडिओमध्ये Porcelain (पांढऱ्या) कलर पर्यायामध्ये दाखवण्यात आहे. तसेच इतर पोस्टरमध्ये ब्लॅक कलरमध्ये पण दिसला आहे.
  • Google Pixel 9 Pro Fold च्या फ्रंट साईडवर पंच होल कटआऊट पाहायला मिळतो. डिव्हाईसमध्ये इनर स्क्रीनवर छोटे बेजल दिसून येत आहेत.
  • बॅक पॅनल पाहता डिव्हाईसमध्ये घुमावदार कॉर्नरसह आयताकृती माड्यूल देण्यात आला आहे. ज्यात चार कॅमेरा मिळू शकतात. यामध्ये एक पेरिस्कोप लेन्स असू शकते.
  • फोनमध्ये कॅमेरा माड्यूलकडे एलईडी फ्लॅश आणि टेंपरेचर सेन्सर दिसत आहे. त्याचबरोबर बॅक पॅनलवर मध्ये कंपनीची ब्रँडिंग आहे.

Google Pixel 9 सीरीजचे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • Pixel 9 Pro Fold मध्ये 6.4 इंचाचा आऊटर डिस्प्ले आणि 7.9 फोल्डेबल इनर स्क्रीन दिली जाऊ शकते. तर Google Pixel 9 Pro मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो.
  • Google Pixel 9 Pro Fold च्या कॅमेरा सेटअपमध्ये OIS सह 48MP Sony IMX 787 प्रायमरी कॅमेरा, 12MP Samsung 3LU अल्ट्रावाईड आणि OIS सह 10.5MP Samsung 3J1 टेलीफोटो लेन्स मिळू शकतो.
  • कव्हर स्क्रीनवर पंच होल कटआऊट आणि आंतरिक स्क्रीनवर डिस्प्लेमध्ये 10MP चा सॅमसंग 3K1 सेल्फी लेन्स लावली जाऊ शकते.
  • NCC सर्टिफिकेशननुसार Pixel 9 Pro Fold मध्ये 20.25W चार्जिंगला सपोर्टसह 4,560mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • पिक्सेल 9 प्रो मध्ये OIS सह 50MP चा सॅमसंग GNK प्रायमरी कॅमेरा, 48MP चा सोनी IMX787 अल्ट्रावाईड कॅमेरा आणि OIS सह 48MP चा सॅमसंग GM5 टेलीफोटो कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • Google Pixel 9 Pro मध्ये 25.20W चार्जिंग स्पीडसह 4,558mAh ची बॅटरी असू शकते.
  • Pixel 9 सीरीजच्या FCC सर्टिफिकेशनमध्ये समोर आले आहे की स्मार्टफोनमध्ये 2.4GHz, 5GHz वाय-फाय, ब्लूटूथ, NFC, UWB आणि 5G कनेक्टिव्हिटी मिळू शकते.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here