Samsung Galaxy A71: स्टाइलिश डिजाइन सह दमदार परफॉर्मंन्स

Samsung ने आपला नवीन फोन Galaxy A71 भारतात लॉन्च केला आहे. हा फोन त्या लोकांसाठी आहे ज्यांना फक्त मोठी स्क्रीन नाही तर आपल्या फोन मध्ये चांगली परफॉर्मेेंस आणि मोठी बॅटरी पण हवी असते. मोठा डिस्प्ले आणि प्रीमियम डिजाइन सारख्या अतिरिक्त फीचर्स सह सॅमसंगने आपल्या यूजर्सना शानदार भेट दिली आहे. या फोनची किंमत 32,999 रुपये आहे. किंमतीनुसार हार्डवेयर पाहिल्यास त्याची यादी मोठी आहे. राहिला प्रश्न सॉफ्टवेयरचा तर सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप फोनचा अनुभव मिड रेंजच्या या फोन मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोन मध्ये sAMOLED Plus Infinity-O Display डिस्प्ले देण्यात आला आहे, त्याचबरोबर On-screen fingerprint sensor मिळेल. तुम्ही फोनची सर्व वैशिष्ट्ये तर जाणून घेतलीत पण तुम्ही माहिती घेतली पाहिजे ती या फोनच्या दमदार परफॉर्मंन्सची. हा फोन तुमचे आवडते हाई-एंड गेम्स फुल सेटिंग मध्ये प्ले करू शकतो. पुढे आम्ही Samsung Galaxy A71 च्या याच वैशिष्ट्यांचा उल्लेख केला आहे.

लॅग-फ्री पावरफुल परफॉर्मंन्स

Samsung Galaxy A71 ला Qualcomm Snapdragon 730 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. 8nm फॅबब्रिकेशन असलेल्या या ऑक्टाकोर प्रोसेसरचा क्लॉक स्पीड 2.2GHz आहे. हा प्रोसेसर Adreno 618 GPU सह येतो आहे जो तुम्हाला शानदार ग्राफिक्सचा अनुभव देण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर 8GB RAM देण्यात आला आहे जो परफॉर्मंन्स मध्ये ऐड-ऑन प्रमाणे आहे. फोनचे हे इंटरनल्स तुम्हाला चांगल्या परफॉर्मंन्सची खात्री देतात. तुम्ही फोन मध्ये काहीही करा ते सर्व टास्क सहज पूर्ण करण्याची क्षमता या फोन मध्ये आहे. खास बाब अशी आहे कि या सर्व गोष्टी फोन बॅटरी सेविंग सह करतो आणि या कुशल क्षमतेसाठी Qualcomm चिपसेटचे आभार मानले पाहिजेत.

मोठ्या मेमरी मध्ये सेव करा अनेक गेम्स, फोटोज आणि वीडियोज

भारतात Galaxy A71, 128GB च्या मोठ्या मेमरी सह उपलब्ध आहे. अनेक लोकांसाठी हि स्पेस त्यांच्या हाई-एंड गेम्स, फोटोज आणि वीडियोज स्टोरेज पेक्षा कितीतरी जास्त आहे. परंतु तरीही जर तुम्हाला वाटले कि मेमरी कमी पडत आहे आहे तर तुम्ही microSD कार्डचा वापर करू शकता. हा फोन अतिरिक्त 512GB च्या मेमरीला सपोर्ट करतो. चांगली बाब अशी आहे कि मेमरी कार्डसाठी कंपनीने dedicated अर्थात खास स्लॉट दिला आहे. त्यामुळे तुम्ही SIM सोबत मेमरी कार्डचा वापर करू शकाल. कार्डसाठी सिम काढण्याची गरज नाही. microSD कार्ड स्लॉटसाठी Samsung ची प्रतिबद्धता खऱ्या अर्थाने इतर मोबाईल निर्मात्यांसाठी एक उदाहरण आहे जे सध्या आपल्या फोन मधून हे फीचर काढून टाकत आहेत.

Game Booster मुळे गेमिंग होईल आणखीन मजेदार

Game Booster गेम खेळताना तुमच्या उपयोगी पडेल. याचा उद्देश्य आहे गेमिंग करताना तुमचे लक्ष केंद्रित करण्याचे आहे. त्यामुळे तुम्ही गेम खेळताना हे फिचर आपोआप ऍक्टिव्ह होईल. हे फीचर गेमिंग चालू असताना नोटिफिकेशन बंद करते, फुल स्क्रीन ऍक्टिव्हेट करते, नेवीगेशन बटन्स लॉक करतो आणि क्विक स्क्रीनशॉट सहित अनेक दुसरे ऑप्शन पण देतो. त्याचबरोबर हे फिचर तुमच्या फोनच्या तापमानावर नजर ठेवतो आणि त्याचबरोबर RAM चा वापर पण बघतो. Game Booster तुमच्या फोन वापराच्या पॅटर्न वर लक्ष ठेऊन तुम्हाला सांगतो कि तुम्ही चार्ज न करता एखादा गेम किती वेळ खेळू शकाल. त्याचबरोबर हाई-एंड गेमिंग करताना तुम्हाला वास्तविक ग्राफिक्सचा अनुभव मिळतो तो पण स्मूद रेंडर आणि चांगल्या फ्रेम रेट सह.

शानदार Infinity-O Display

सिंगल punch-hole display जो आतापर्यंत फक्त फ्लॅगशिप Samsung Galaxy फोन मध्ये होता तो कंपनी आता आपल्या नवीन A-series च्या फोन मध्ये घेऊन आली आहे. या फोन मध्ये 6.7-इंचाचा Super AMOLED Plus डिस्प्ले पॅनल आहे जो 1080 x 2400 पिक्सल रेजल्यूशन सह येतो. याच्या शाानदार कॉन्ट्रास्ट लेवल आणि चांगल्या रंगांचे कौतुक तर करावे लागेलच. फोन मध्ये तुम्ही काही बघितले तर असा अनुभव होतो जणू ती गोष्ट तुमच्या डोळ्यांसमोर आहे. हा real-to-life रंग देऊ शकतो. तुम्ही गेम खेळा किंवा चित्रपट बघा, वेब-सर्फिंग करा किंवा सोशल मीडिया ब्राउज करा, याचा शानदार पॅनल तुम्हाला नक्की आवडेल. कंपनीने हा फुल स्क्रीन सह सादर केला आहे आणि याचे बेजल्स खूप बारीक आहेत. त्यामुळे वीडियो बघताना तुम्हाला तुमचे लक्ष विचलित होत नाही आणि तुम्ही त्यात हरवून जाल.

मोट्या बॅटरी सह फास्ट चार्जिंग सपोर्ट

Galaxy A71 मध्ये 4,500mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि हि तुम्हाला रोजच्या कामात मोठा बॅकअप देण्याचा विश्वास देते. हा डिवाइस तुम्हाला चार्जिंगच्या काळजीविना संपूर्ण एक दिवस घालवण्याचा विश्वास देतो. याला फरक पडत नाही कि तुम्ही यात गेम खेळत आहात, वीडियो स्ट्रीमिंग करत आहात किंवा सोशल मीडिया बघत आहात. एकमात्र आहे जर तुम्हाला फोन मध्ये वीडियो बघणे आवडत असले तर हा डिवाइस तुमच्यासाठी अजून चांगला आहे. कंपनीचा दावा आहे कि हा फोन 24 तास वीडियो प्लेबॅक टाइम देऊ शकतो. अर्थात तुमच्याकडे आवडीचा टीव्ही शो आणि चित्रपट बघण्यासाठी पुरेशा वेळ असायला हवा. बॅटरी नंतर जर चार्जिंग बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 25W Super-Fast Charging सपोर्ट आहे जो खूप कमी वेळात फोन चार्ज करतो.

Samsung Knox देईल संपूर्ण सुरक्षा

Samsung Knox च्या मल्टी लेयर्ड सिक्योरीटीचा फायदा आता रहस्य राहिलेले नाही. म्हणूनच Galaxy A71 मध्ये तुम्हाला हीच सुरक्षा मिळेल याचे आश्चर्य वाटून घेऊ नका. हि सुरक्षा हार्डवेयर सोबतच सॉफ़्टवेयर स्थरावर पण काम करते, ज्यामुळे तुमची महत्वपूर्ण माहिती मालवेअर आणि इतर दुर्घटनांपासून सुरक्षित निश्चितपणे सुरक्षित राहते. Knox ची Defense grade सुरक्षा या स्मार्टफोनला मिड-रेंज सेगमेंट मध्ये निश्चितपणे दुसऱ्या स्मार्टफोनच्या तुलनेत पुढे नेऊन ठेवते.

कमालीचा कॅमेरा

Galaxy A71 च्या रियर पॅनल मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. फोनचा मेन कॅमेरा 64MP चा आहे जो f/1.8 अपर्चर सह येतो. हा फोन शानदार high-resolution पिक्चर क्लिक करू शकतो. यातून क्लिक केलेले फोटोज झूम करा किंवा क्रॉप करा डिटेलिंग शानदार मिळेल. मेन कॅमेऱ्याला 12MP Ultra wide-angle कॅमेऱ्याची सोबत मिळाली आहे आणि हा 123-degree अँगल व्यू सह फोटोग्राफी करू शकतो. चांगली बाब अशी म्हणता येईल कि Ultra-wide-angle सेंसर खास Ultra Wide Night Mode सह येतो जो खूप कमी प्रकाशात पण चमकदार फोटो क्लिक करू शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये कॅमेऱ्यासह Super Steady video mode देण्यात आला आहे जो मूविंग कंडिशन मध्ये पण वीडियोग्राफी करताना वीडियो स्थिर ठेवतो.

फोनचा तिसरा सेंसर 5MP चा आहे आणि हा Macro कॅमेरा आहे. हि लेंस तुम्हाला अगदी जवळून close-up शॉट्स घेताना चांगल्या डिटेलिंग सह पिक्चर क्लिक करण्यास मदत करेल. तसेच चौथा 5MP चा Depth सेंसर आहे जो या फोन मध्ये देण्यात आलेल्या Live Focus फीचरसाठी आहे. Live Focus इमेज क्लिक करण्याआधी व्यूफाइंडर मध्ये Bokeh इफेक्ट्स म्हणजे ब्लर बॅकग्राउंड ऑन करतो आणि शॉट कॅप्चर केल्यानंतर पण तुम्ही यात बदल करू शकता याची सोय करतो.

मागच्या कॅमेऱ्यानंतर जेव्हा फ्रंट कॅमेऱ्याकडे वळायचे झाले तर यात 32MP चा सेंसर आहे जो सेल्फी घेताना पण ब्लर बॅकग्राउंड सह पिक्चर क्लिक करू शकतो. तसेच Samsung Galaxy A71 च्या Slow-mo सेल्फी फिचर सह तुमची सेल्फी अजून चांगली होईल. याचा 32MP फ्रंट कॅमेरा हाई-रेजल्यूशन स्लो-मोशन वीडियो रेकॉर्ड करतो.

Samsung Pay

Galaxy A71 मध्ये Samsung Pay चे इंटीग्रेशन आहे आणि हे कोणत्याही खरेदीच्या वेळी तुम्हाला पेमेंटची सर्वात स्मार्ट पद्धत देतो. Samsung Pay, फोन वर कार्ड टोकनाइज्ड सिस्टम द्वारे सुरक्षितपणे तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड ऍड करतो. त्यामुळे खरेदी करताना पेमेंट करण्यासाठी तुम्हाला कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही उलट Point of Sale (POS) टर्मिनल्स वर जिथे कार्ड स्वाइप आणि टॅप होते फक्त तिथे पेमेंट करता येईल.

किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy A71 भारतीय बाजारात ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही चॅनल्स वर उपलब्ध आहे. फोनचा 8GB + 128GB वेरियंट 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Prism Crush Black, Prism Crush Blue आणि Prism Crush Silver सहित तीन रांगांमध्ये उपलब्ध आहे.

निष्कर्ष

आता पर्यंत तुम्हाला समजले असेल कि Samsung Galaxy A71 हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर, डिजाइन आणि परफॉर्मंन्स, स्टाइल आणि फंक्शन प्रत्येक बाबतीत उत्तम कामगिरी करतो. थोडक्यात सांगायचे झाले तर हा एक ऑलराउंड पॅकेज त्या लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या फोन मध्ये सर्व काही हवे आहे. हा फोन यूजरला जास्त खर्च केल्याविना प्रीमियम फोनचा अनुभव देण्यास सक्षम आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here