IPL 2021: असे केल्यास Jio युजर बघू शकतील प्रत्येक मॅच मोफत

IPL चा 14वा सीजन यावेळी भारतात 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. गेल्यावर्षी कोरोना वायरस महामारीमुळे आईपीएलचे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये करण्यात आले होते. पण, यावेळी कोविड-19 चा परिणाम इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) वर होत असल्याचे दिसत नाही. 9 एप्रिलला उदघाटन सोहळ्याने Vivo IPL 2021 ची सुरुवात होईल. त्यात जर तुम्हाला कोरोनामुळे स्टेडियममध्ये जाऊन मॅच न बघता येण्याचे दुःख झाले असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक असा जुगाड घेऊन आलो आहोत, ज्याने तुम्ही घरबसल्या मोठ्या टीव्ही स्क्रीन सोबतच मोबाईलवर IPL ची मॅच लाइव बघू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे ‘इंडियन प्रीमियर लीग 2020’ चे डिजिटल राइट स्टारकडे आहेत आणि कंपनीने आपल्या चॅनेल्स सोबतच मोबाईल अ‍ॅप Disney+ Hotstar VIP वर पण मॅच लाइव दाखवत आहे. (IPL 2021 watch live online India timings Disney Plus Hotstar Star Sports cricket)

IPL 2021

परंतु संपूर्ण मॅच बघण्यासाठी Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिशन घ्यावे लागेल. पण, निराश होऊ नका. Disney+ Hotstar VIP साठी शुल्क दयावे लागत असले तरी, जियोकडे असे अनेक शानदार प्लान्स आहेत, ज्यात Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे.

1. Jio plans with free IPL season

रिलायंस जियोकडे अनेक प्लान्स आहेत, ज्यात Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. कंपनीच्या 401 रुपये, 499 रुपये, 598 रुपये, 777 रुपये आणि 2599 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्स डेटा आणि फ्री कॉलिंग सोबतच आईपीएलच्या सर्व मॅच बघू शकतील. तसेच, 612 रुपये, 1004 रुपये, 1206 रुपये आणि 1208 रुपयांच्या जियो क्रिकेट डेटा अ‍ॅड-ऑन पॅकमध्ये पण युजर्सना एका वर्षासाठी डिज्नी हॉटस्टॉर विआयपीचे सब्सक्रिप्शन मिळेल. पुढे जाऊन घेऊया सर्व प्लान्स बाबत सर्वकाही.

401 रुपयांचा प्लान

401 रुपयांच्या प्लानमध्ये वॅलिडिटी 28 दिवसांची आहे, त्याचबरोबर ग्राहकांना 90 जीबी डेटा मिळेल. प्लानमध्ये जियो नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन-जियो नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतील. त्याचबरोबर युजर्सना या प्लानमध्ये 100 मोफत एसएमएसची सुविधा मिळेल.

598 रुपयांचा प्लान

तर, 598 रुपयांच्या प्लानमध्ये डेली 2GB डेटा मिळेल. या प्लानची वैधता 56 दिवस आहे. यात जियो-टू-जियो वॉयस कॉलिंग फ्री आणि नॉन-जियो नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे मिळतील.

499 रुपयांचा प्लान

499 रुपयांच्या प्रीपेड प्लानबद्दल बोलायचे तर हा प्लान प्रतिदिन 1.5 जीबी डेटा बेनेफिटसह येतो आणि यात तुम्हाला 56 दिवसांची वैधता मिळते. हा फक्त डेटा पॅक आहे, ज्यात तुम्हाला वॉयस व एसएमएस बेनेफिट्स मिळणार नाहीत.

777 रुपयांचा प्लान

777 रुपयांचा प्लान पाहता, या प्लानमध्ये पण तुम्हाला प्रतिदिन 1.5 जीबी हाई स्पीड डेटा मिळेल. तसेच या प्लानमध्ये तुम्हाला अतिरिक्त 5 जीबी डेटा 84 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. या पॅकमध्ये तुम्हाला जियो टू जियो अनलिमिटेड कॉल्स, जियो टू नॉन जियोवर 3,000 मिनिट्स आणि प्रतिदिन 100 एमएमएस बेनेफिट मिळतो.

2599 रुपयांचा प्लान

जियोचा 2,599 रुपयांचा प्लान पाहता कंपनीच्या दीर्घ वैधता असलेल्या प्लानच्या यादीत याचा समावेश झाला आहे. या प्लानमध्ये युजर्सना एकूण 740 जीबी डेटा दिला जात आहे म्हणजे ग्राहक रोज 2 जीबी डेटा वापरू शकतात. तसेच युजर्सना 10 जीबी अतिरिक्त डेटा पण मिळत आहे. या पॅकची वॅलिडिटी 365 दिवस आहे. या पॅकमध्ये पण अनलिमिटेड वॉइस कॉलची सुविधा आहे, जियो नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन-जियो नेटवर्कवर कॉलसाठी 12 हजार मिनिटे वर्षभरात मिळतील. ग्राहक रोज 100 मोफत एसएमएस पाठवू शकतील. युजर्सना जियो अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. तसेच या पॅकमध्ये पण 399 रुपयांची डिज्नी+ हॉटस्टार मेंबरशिप 1 वर्षासाठी मिळेल.

612 रुपयांचा डेटा अ‍ॅड-ऑन पॅक

या यादीत सर्वप्रथम 612 रूपाच्या अ‍ॅड-ऑन प्लान पाहता, यात नॉन-जियो नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी यात 6000 FUP मिनिटे मिळत आहेत. तसेच 72 जीबी अनलिमिटेड डेटा मिळत आहे. या प्लानची वॅलिडिटी युजरच्या चालू प्लान इतकी असेल. या पॅकमध्ये पण 399 रुपयांची डिज्नी+ हॉटस्टार मेंबरशिप 1 वर्षासाठी मोफत मिळेल.

1,004 रुपयांचा डेटा अ‍ॅड-ऑन पॅक

या प्लानमध्ये 200 जीबी डेटा बेनिफिट पण युजर्सना मिळेल आणि यासाठी आधी सक्रिय प्लान नंबरवर असणे आवश्यक नाही. या प्लानने कधीही रिचार्ज करता येईल आणि याची वॅलिडिटी 120 दिवस आहे. या पॅकमध्ये पण 399 रुपयांची डिज्नी+ हॉटस्टार मेंबरशिप 1 वर्षासाठी मोफत मिळेल.

1,206 रुपये आणि 1,208 रुपयांचा डेटा अ‍ॅड-ऑन पॅक

1,206 रुपयांच्या डेटा अ‍ॅड-ऑन पॅकमध्ये कंपनीद्वारे 180 दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे. यासाठी पण कोणत्याही बेस प्लानची गरज नाही. 1,208 रुपयांच्या या प्लानमध्ये 240 जीबी डेटासह 240 दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे. या डेटा अ‍ॅड-ऑन पॅकसाठी पण कोणत्याही बेस प्लानची गरज नाही. या पॅकमध्ये पण 399 रुपयांची डिज्नी+ हॉटस्टार मेंबरशिप 1 वर्षासाठी मोफत मिळेल.

JioFiber च्या या प्लानमध्ये मोफत बघा IPL

Jio Fiber वापरकर्त्यांना 999 रुपयांपासून सुरु होणाऱ्या आपल्या ब्रॉडबॅंड प्लानसह आईपीएल मोफत बघण्याची संधी मिळेल. चला एक नजर टाकूया Jio Fiber ब्रॉडबॅंड प्लान्सवर जे डिज्नी + हॉटस्टार विआयपीचे मोफत सब्सक्रिप्शन देते आहेत.

JIOFIBER RECHARGE PLAN PRICE BENEFITS OF JIOFIBER PLAN
JioFiber Rs 999 Plan
  • Disney Plus Hotstar VIP + 10 other OTT apps
  • 150Mbps speed
  • Unlimited voice calling
JioFiber Rs 1,499 Plan
  • Disney Plus Hotstar VIP and 11 other OTT apps
  • 300Mbps speed
  • Unlimited voice calling
JioFiber Rs 2,499 Plan
  • Disney Plus Hotstar VIP and 11 other OTT apps
  • 500Mbps speed
  • Unlimited voice calling
JioFiber Rs 3,999 Plan
  • Disney Plus Hotstar VIP and 11 other OTT apps
  • 1Gbps speed
  • Unlimited voice calling
JioFiber Rs 8,499 Plan
  • Disney Plus Hotstar VIP and 11 other OTT apps
  • 1Gbps speed
  • Unlimited voice calling

Jio Postpaid Plus

Jio पोस्टपेड प्लस प्लान Disney Plus Hotstar VIP च्या मोफत सदस्यत्वासह बंडल केले गेले आहेत, जे IPL 2021 ची लाइव स्ट्रीमिंग देतात. या प्लानची किंमत 399 रुपयांपासून सुरु होत आहे आणि हे डिज्नी प्लस Hotstar VIP, Netflix आणि Prime चे सदस्यत्व मोफत देत आहेत.

JIO POSTPAID PLUS PLANS BENEFITS
Rs 399
  • 75GB data
  • Unlimited voice calls and SMSes
  • 200GB data rollover
  • Disney+ Hotstar VIP, Netflix, Prime Videos subscription, Jio apps
Rs 599
  • 100GB data
  • Unlimited voice calls and SMSes
  • 200GB data rollover
  • 1 additional SIM card with Family Plan
  • Disney+ Hotstar VIP, Netflix, Prime Videos subscription, Jio apps
Rs 799
  • 150GB data
  • Unlimited voice calls and SMSes
  • 200GB data rollover
  • 2 additional SIM card with Family Plan
  • Disney+ Hotstar VIP, Netflix, Prime Videos subscription, Jio apps
Rs 899
  • 200GB data
  • Unlimited voice calls and SMSes
  • 500GB data rollover
  • 3 additional SIM card with Family Plan
  • Disney+ Hotstar VIP, Netflix, Prime Videos subscription, Jio apps
Rs 1,499
  • 300GB data
  • Unlimited voice calls and SMSes
  • 500GB data rollover
  • Unlimited voice calls and data benefits in UAE and USA
  • Disney+ Hotstar VIP, Netflix, Prime Videos subscription, Jio apps

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here