HMD Hyper स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आले समोर, लवकर होऊ शकतो लाँच

HMD देश आणि जगामध्ये आपला मोबाईल प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आहे. सांगण्यात आलं आहे की यात नवीन फोन HMD Hyper नावाने एंट्री घेऊ शकतो. परंतु ब्रँडने घोषणा केली नाही, मात्र याआधी याचे स्पेसिफिकेशन आणि फोटो लीकमध्ये समोर आले आहेत. ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

HMD Hyper चे स्पेसिफिकेशन (लीक)

  • डिस्प्ले: लीकनुसार HMD Hyper मध्ये कंपनी OLED डिस्प्ले प्रदान करू शकते. यावर एफएचडी प्लस रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळण्याची संभावना आहे.
  • चिपसेट: फोनच्या प्रोसेसर बाबत सांगण्यात आले आहे की यात स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 असू शकतो. म्हणजे की युजर्सना फोनमध्ये चांगला परफॉर्मन्स मिळेल.
  • स्टोरेज आणि रॅम: स्टोरेज ऑप्शन पाहता लीकनुसार फोन 8GB रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेल सह सादर असू शकतो. यात मेमरीला वाढवण्यासाठी मायक्रो एसडी स्लॉट पण दिला जाऊ शकतो.
  • कॅमेरा: डिव्हाईसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स ऑप्टिकल फोटो स्टॅबिलायजेशन सेन्सरसह लावला जाऊ शकतो. त्याचबरोबर 13 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 8 मेगापिक्सलची इतर लेन्स मिळण्याची चर्चा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  •  बॅटरी आणि चार्जिंग: फोनला चालवण्यासाठी यात 4700mAh ची बॅटरी आणि 33 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्टचा संयोजन दिले जाऊ शकते.
  • कनेक्टिव्हिटी: डिव्हाईसमध्ये 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी, यूएसबी टाईप सी पोर्ट सारखे फिचर्स मिळतात.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता HMD Hyper स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.

HMD Hyper डिझाईन (लीक)

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर समोर आलेल्य लीकमध्ये HMD Hyper चा फोटो पण आहे.
  • फोटोनुसार एचएमडी हायपर मध्ये एचएमडी स्कायलाईन सारखी डिझाईन असण्याची शक्यता आहे. जो पूर्व नोकिया लूमिया मॉडेल सारखा वाटत आहे.
  • लीक झालेल्या फोटो मध्ये डिव्हाईस येलो कलरमध्ये दाखविला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर पंच-होल डिझाईन पाहायला मिळते.
  • डिव्हाईसच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेन्सर, LED फ्लॅश, आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आणि उजव्या साईडवर वॉल्यूम आणि पावर बटन आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here