Categories: बातम्या

HMD Pulse स्मार्टफोनचा फोटो लाँचच्या आधी आला समोर, पाहा लूक

काही महिन्यांपासून बाजारात चर्चा सुरू आहे की HMD लवकरच आपल्या नवीन Pulse सीरिज स्मार्टफोन आणू शकतो. या अंतर्गत HMD Pulse आणि HMD Pulse Pro येण्याची शक्यता आहे. परंतु आतापर्यंत आधाकारिक लाँच तारिख आलेली नाही, परंतु याआधी लीकमध्ये मोबाईलचे रेंडर्स समोर आले आहेत. ज्यात डिझाईनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे या पोस्टमध्ये सामान्य मॉडेल एचएमडी पल्सची माहिती जाणून घेऊया.

HMD Pulse चे रेंडर्स (लीक)

  • HMD Pulse स्मार्टफोनबद्दल हा फोटोज माय स्मार्ट प्राईस आणि टिपस्टर ओनलीक्सच्या माध्यमातून शेअर करण्यात आली आहेत.
  • रेंडर्समुळे माहिती मिळाली आहे की फोनमध्ये फ्लॅट कार्नर असणार आहे आणि एचएमडी ब्रँडिंगसह एक सामान्य बॅक पॅनल फिनिश मिळेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहू शकता की अगामी HMD Pulse स्मार्टफोन तीन कलर पर्यायामध्ये उपलब्ध होऊ शकतो ज्यात ब्लू, ब्लॅक आणि पिंकचा समावेश आहे.
  • बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा मॉड्यूल असलेला LED फ्लॅश दिसतो. तसेच कॅमेऱ्याची माहिती पाहून असे वाटत आहे की यात AI फिचर पण मिळू शकतात.
  • फोनच्या मागच्या पॅनलवर सेंटरमध्ये HMD ब्रँडिंग पाहायला मिळू शकते. तसेच पावर आणि वॉल्यूम बटन उजव्या साईडवर आहेत.

HMD Pulse चे स्पेसिफिकेशन (लीक)

HMD च्या नवीन मोबाईल HMD Pulse बद्दल प्रमुख स्पेसिफिकेशन पण सांगितले आहेत.

  • डिस्प्ले: लीकनुसार HMD Pulse फोनमध्ये 6.56 इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर पंच होल डिझाईन सादर केली जाऊ शकते.
  • प्रोसेसर: HMD Pulse चे प्रोसेसर पाहता लीकनुसार यात ऑक्टाकोर प्रोसेसर मिळण्याची चर्चा आहे. परंतु हा कोणत्या नावाने येईल याबाबत माहिती मिळाली नाही.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता डिव्हाईसमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळण्याची अपेक्षा केली जात आहे. तसेच, पाहायचे आहे की ब्रँडकडून फोनमध्ये इतर कोणती कॅमेरा लेन्स लावली जाऊ शकते.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत हा नवीन डिव्हाईस 5000mAh ची बॅटरीसह येऊ शकतो तर फास्ट चार्जिंगबद्दल अजून माहिती मिळाली नाही.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता HMD Pulse स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.
Published by
Kamal Kant