8जीबी रॅम सह लॉन्च झाला आॅनर 10 जीटी

टेक कंपनी आॅनर ने मे मध्ये भारतीय बाजारात आपला स्टाइलिश स्मार्टफोन आॅनर 10 लॉन्च केला होता. या फोन चे स्पेसिफिकेशन्स जेवढे दमदार आहेत हा फोन दिसायलाही तेवढाच स्टाईलिश आणि शानदार आहे. कंपनी ने आॅनर 10 6जीबी रॅम सह सादर केला होता. आज कंपनी ने या फोन चा अजून एक वर्जन आॅनर 10 जीटी पण लॉन्च केला आहे. स्मार्टफोन मध्ये 8जीबी पावरफुल रॅम सह अनेक आर्कषक फीचर्स आहेत.

आॅनर 10 जीटी कंपनी ने 8जीबी रॅम सह बाजारात आणला आहे. कंपनी ने या फोन मध्ये जीपीयू टर्बो फीचर दिला आहे. फोन चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आॅनर 10 प्रमाणे हा फोन पण एल्यूमिनियम फ्रेम वर बनवण्यात आला आहे ज्याचा फ्रंट आणि बॅक पॅनल ग्लास चा बनलेला आहे. फोनचा कलर आणि बिल्ड क्वॉलिटी याला प्रीमियम लुक देतो. हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 5.84-इंचाचा फुलएचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे.

आॅनर 10 इमोशन यूआई 8.1 सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 2.36गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवई च्या सर्वात ताकदवान चिपसेट किरीन 970 वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 जीपीयू देण्यात आला आहे. भारतात कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी चा पावरफुल रॅम दिला आहे तसेच फोन ची इंटरनल स्टोरेज 128जीबी आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर आॅनर 10 च्या बॅक पॅनल वर डुअल ​​रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एआई टेक्निक आहे. या फोन मध्ये तुम्हाला 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चे दोन लेईका चे कॅमेरा सेंसर मिळतील जे एलईडी फ्लॅश सह येतील. सेल्फी साठी आॅनर 10 मध्ये 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. लो लाईट मध्ये पण चांगल्या फोटोग्राफ साठी सेल्फी कॅमेरा पण फ्लॅश लाईट सह येतो.

आॅनर 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये तुम्हाला वाईफाई ब्लूटूथ सह एनएफसी पण मिळेल. चांगल्या म्यूजिक क्वालिटी साठी कंपनी ने यात एके4376 हाई-फाई चिप दिली आहे. आॅनर 10 च्या फ्रंट पॅनल वर अंडर ग्लास फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. पावर बॅकअप साठी आॅनर 10 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here