ऑनरने लॉन्च केला 3जीबी रॅम असलेला स्वस्त स्मार्टफोन Honor 8A 2020

ऑनरने कालच आपल्या होम मार्केट चीन मध्ये दोन नवीन फोन Honor Play 4T आणि Play 4T Pro लॉन्च केले आहेत. हे फोन मिड सेग्मेंट मध्ये आले आहेत जे शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतात. प्ले सीरीज लॉन्च केल्यानंतर आता ऑनरच्या अजून एका फोनची बातमी समोर येत आहे. परदेशी मीडिया रिपोर्ट मधून माहिती मिळाली आहे कि ऑनरचा Honor 8A 2020 स्मार्टफोन यूकेच्या शॉपिंग साइट वर लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग सोबतच फोनचा फोटो, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा पण झाला आहे. Honor 8A 2020 एक लो बजेट फोन आहे जो यूके आणि यूरोप मध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

लुक व डिजाईन

Honor 8A 2020 कंपनीने कमी किंमतीत लॉन्च केला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा नॅरो बेजल्स सह येतात तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोन डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या चिन पार्ट वर Honor ची ब्रॅंडिंग आहे. Honor 8A 2020 च्या बॅक पॅनल वर सिंगल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो उजवीकडे आहे. या कॅमेरा सेंसरच्या खाली लेंसची माहिती लिहिण्यात आली आहे आणि त्याच्याखाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच खालच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये Honor चा लोगो आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे.

स्पेसिफिकेशन्स

Honor 8A 2020 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.09 इंचाच्या आईपीएस एलसीडी ड्यूड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 9 वर सादर केला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर बनलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी35 चिपसेट वर चालतो.

ऑनर 8ए 2020 कंपनीने 3 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो पीडीएएफ फीचरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Honor 8A 2020 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Honor 8A 2020 एक 4जी फोन आहे जो डुअल सिमला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि 3.5एमएम जॅक सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 3020 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Honor 8A 2020 130 पाउंड मध्ये वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 12,000 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here