लाँच झाला स्वस्त 50MP कॅमेरा असलेला 5G मोबाईल, Jio युजर्सना मिळणार 5000 रुपयांचा फायदा

Motorola India नं अखेरीस आपला स्वस्त 5G मोबाइल Moto G62 भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन कंपनीच्या G-सीरीजमध्ये आलेला 7वा फोन आहे. यंदा कंपनीनं 6 मोबाइल जी-सीरीजमध्ये सादर केले आहेत. अलीकडेच Moto G32 सादर करण्यात आला होता. मोटो जी62 फोन बद्दल बोलायचं झालं तर हा फ्रॉस्टेड ब्लू आणि मिडनाइट ग्रे कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे, ज्याची विक्री 19 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि प्रमुख ऑफलाइन स्टोर्सच्या माध्यमातून केली जाईल.

Moto G62 5G के स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. तसेच डिवाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G SoC वर चालतो जो भारतात 5G कनेक्टिव्हिटीच्या 12 बँडसह सादर करण्यात आला आहे. हा दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट 6GB + 128GB आणि 8GB + 128GB सह बाजारात आला आहे.

फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड व डेप्थ कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे, जो डिस्प्लेवरील पंच होलमध्ये मिळतो. डिवाइसमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात एक नियर-स्टॉक Android 12 अनुभव मिळते. फोन IP52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टंस्टसह बाजारात आला आहे. तसेच, डिवाइसच्या कडेला एक फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. स्टीरियो ऑडियो डिलिव्हरीसाठी फोनमध्ये डॉल्बी एटमॉस-सर्टिफिकेशन असलेले स्पीकर आहेत.

Moto G62 ची किंमत आणि बँक ऑफर

Moto G62 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपये आहे.

मोटो जी62 सह कंपनीनं अनेक आणि लाँच ऑफर देखील सादर केल्या आहेत. कंपनी या फोनवर 1500 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटसाठी तुम्हाला HDFC बँकेच्या कार्डनं पेमेंट करावं लागेल. HDFC कार्डद्वारे EMI ट्रँजॅक्शन केल्यावर तुम्हाला 1750 रुपयांची सूट देखील मिळेल.

Jio युजर्सना मिळणार 5,000 रुपयांचा फायदा

जर तुम्ही Reliance Jio युजर असाल तर तुम्हाला या फोनच्या खरेदीवर 5049 रुपयांचा फायदा होईल. ज्यात 4 हजार रुपयांच्या कॅशबॅक व्हाउचरसह 500 रुपयांचा Myntra कुपन आणि झी5च्या सब्सक्रिप्शनवर 549 रुपयांचा डिस्काउंटचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here