आॅनर ने गेल्या महिन्यात खुपच शानदार आणि पावरफुल स्मार्टफोन आॅनर 8एक्स ग्लोबल मंचावरून सादर केला होता. नॉच डिस्प्ले सह येणारा हा फोन दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. आॅनर 8एक्स समोर आल्यापासून इंडियन फॅन्स पण या स्मार्टफोन लॉन्च ची वाट बघत आहेत. आता आॅनर ने इंटरनेशनल अनांउसमेंट करत आॅनर 8एक्स च्या इंडिया लॉन्च ची घोषणा केली आहे. आॅनर 8एक्स येत्या 16 ऑक्टोबरला भारतात लॉन्च केला जाईल.
आॅनर ने आपल्या ग्लोबल आॅफिशियल वेबसाइट वर आॅनर 8एक्स च्या इंडिया लॉन्चच्या तारखेचा खुलासा केला आहे. कंपनी या महिन्यात अनेक इंटरनेशनल मार्केट्स मध्ये आॅनर 8एक्स घेऊन येत आहे आणि त्यात भारताचे नाव आहे. आॅनर ने सांगितले आहे की कंपनी 16 ऑक्टोबरला दिल्ली मध्ये एका लॉन्च ईवेंटचे आयोजन करेल आणि याच ईवेंट मधून आॅनर 8एक्स बाजारात येईल.
आॅनर ने आपल्या वेबसाइट वर आॅनर 8एक्स चा उल्लेख केला आहे तसेच अशी आशा व्यक्त केली जात आहे की कंपनी 16 ऑक्टोबरला आॅनर 8एक्स सोबत अजुन याचा अजून एक वेरिएंट आॅनर 8एक्स मॅक्स पण लॉन्च करू शकते. फोनचे स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 6.5-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने हा फुल एचडी प्लस डिस्प्ले सह सादर केला आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2,340 x 1,080 पिक्सल आहे. विशेष म्हणजे यात तुम्हाल 19:9 आसपेक्ट रेशियो वाला नॉच डिस्प्ले मिळेल ज्याला कंपनी ने पर्ल डिस्प्ले नाव दिले आहे.
आॅनर 8एक्स हुआवई च्या नवीन किरीन 710 चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी आणि 6जीबी रॅम देण्यात आला आहे या सोबत तीन स्टोरेज वेरियंट आहे. 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आहे तर 6जीबी मध्ये 64जीबी आणि 128जीबी ची स्टोरेज मिळेल. सोबत 400 जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
फोटोग्राफी साठी फोन मध्ये 20-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा एफ/1.8 अपर्चर सह दिला आहे. तसेच फ्रंट मध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेटअप मिळेल. कॅमेरा सह तुम्हाला एआई इंटीग्रेशन मिळेल. हा फोन एंडरॉयड इमोशन यूआई वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 वर आधारित आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
आॅनर 8एक्स मॅक्स मध्ये 7.12-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी 2244×1080 पिक्सल सह उपलब्ध आहे. यात पण छोटी वाटर ड्रॉप नॉच मिळेल. पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जला सपोर्ट करते.
हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. तसेच कंपनी ने माहिती दिली आहे की याचा एक मॉडेल स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह उपलब्ध होईल ज्यात 6जीबी मेमरी असेल. हा फोन ऑक्टोबर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.
फोटोग्राफी साठी आॅनर 8एक्स मॅक्स मध्ये 16-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे आणि हा एफ/2.0 अपर्चर सह उपलब्ध आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा एफ/2.0 अपर्चर सह उपलब्ध आहे.















