Honor 90 सप्टेंबरमध्ये येऊ शकतो भारतात, दमदार स्पेसिफिकेशन्ससह लुकही शानदार

Highlights

  • ऑनर कंपनी पुन्हा एकदा भारतात पदार्पण करणार आहे.
  • Honor 90 सीरीज अंतगर्त नवीन फोन लाँच होतील.
  • फोनच्या संपूर्ण अनबॉक्सिंगचा व्हिडीओ समोर आला आहे.

टेक्नॉलॉजी बाजारात एक खास स्थान बनवणारी ऑनर कंपनी पुन्हा एकदा भारतात येण्यासाठी तयार आहे. असं सांगितलं जात आहे की कंपनी आपल्या Honor 90 सीरीज अंतगर्त नवीन फोन भारतात लाँच करणार आहे. कंपनीनं ह्याबाबत कोणताही खुलासा केला नाही, परंतु प्रसिद्ध युट्युबरनं ऑनरच्या पुनरागमनची बातमी दिली आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो Honor 90

युट्युब चॅनेल टेक्निकल गुरुजीनं ऑनर स्मार्टफोनच्या पुनरागमनाची माहिती दिली आहे. नवीन अनबॉक्सिंग व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की Honor 90 स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. व्हिडीओमध्ये लाँच डेट सांगण्यात आली नाही. परंतु फोनची अनबॉक्सिंग करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हा फोन भारतात येईल अशी चिन्ह दिसू लागली आहेत.

Honor 90 ची डिजाइन

व्हिडीओमध्ये दिसत आहे की Honor 90 क्वॉड कर्व डिजाइनसह येईल. डिस्प्लेवर पंच होल कटआउट देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर दोन वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश आहे. तसेच खालच्या बाजूला ऑनरची ब्रँडिंग देण्यात आली आहे. डिवाइसच्या उजवीकडे वॉल्यूम अप डाउन आणि पावर बटन देण्यात आला आहे.

Honor 90 चे स्पेसिफिकेशन्स (चिनी मॉडेल)

  • डिस्प्ले : डिवाइसमध्ये 1.5K रेजोल्यूशनसह 6.7 इंचाचा कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 3840Hz PWM डिमिंग सपोर्ट मिळतो.
  • प्रोसेसर : शानदार परफॉरमेंससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे.
  • स्टोरेज : स्मार्टफोन 16GB पर्यंत रॅम + 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा : हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप आला आहे. ह्यात इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्टसह 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो. तसेच 12MP ची अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कालिंगसाठी 50MP चा सेन्सर आहे.
  • बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • OS : Honor 90 अँड्रॉइड 13 आधारित मॅजिकयुआय 7.1 वर चालतो.
  • अन्य : डिवाइसमध्ये युजर्सना इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, वाय-फाय 6, यूएसबी टाइप-सी 2.0, ब्लूटूथ 5.2 सारखे अनेक फीचर्स मिळतात.
  • वजन आणि डायमेंशन : फोनचे वजन 183 ग्राम आणि डायमेंशन 161.9 x 74.1 x 7.8mm आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here