16GB पर्यंत रॅम, 256GB स्टोरेज, 8300mAh बॅटरी असलेला HONOR Pad 9 जागतिक बाजारात लाँच

Highlights

  • MWC 2024 मध्ये HONOR Pad 9 सादर झाला आहे.
  • यात 16 जीबी पर्यंत टर्बो रॅम देण्यात आली आहे.
  • हा स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसरसह येतो.


MWC 2024 ची सुरूवात झाली आहे यामध्ये अनेक ब्रँड आपल्या जबरदस्त प्रॉडक्ट्सवरून पडदा उठविणार आहेत. यात ऑनर पण मागे नाही, कंपनीनं मॅजिक 6 प्रो स्मार्टफोननंतर जागतिक बाजारात HONOR Pad 9 सादर केला आहे. हा पातळ आणि लाइट डिझाईनसह 12.1 मोठी स्क्रीन, 16GB पर्यंत रॅम, 256GB स्टोरेज, 8300mAh बॅटरी सारखे अनेक फिचर्ससह आहे. चला, पुढे याचे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती जाणून घेऊया.

HONOR Pad 9 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिझाईन: HONOR Pad 9 टॅबलेट खूप पातळ आहे याचे वजन 555 ग्रॅम आणि डायमेंशन 6.96 मिमी आहे. टॅबच्या मागच्या बाजूला मध्ये कॅमेरा लावण्यात आला आहे. जो यूनिक डिझाईन प्रदान करतो. तसेच याची बॉडी मेटलची बनली आहे.
  • डिस्प्ले: ऑनर पॅड 9 मध्ये हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 12.1-इंच, 2.5K एलसीडी डिस्प्ले आहे. ही स्क्रीन टीयूवी रीनलँड रेटिंगसह ठेवण्यात आली आहे ज्याच्या मदतीने डोळ्यावर खराब प्रभाव पडत नाही.
  • प्रोसेसर: दमदार युजर एक्सपीरियंससाठी ब्रँडने या टॅबमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसरचा वापर केला आहे.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे. त्याचबरोबर टर्बो रॅम सादर करण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्ही 16 जीबी पर्यंत रॅमपर्यंत वाढवू शकता.
  • कॅमेरा: कॅमेऱ्याच्या बाबतीत HONOR Pad 9 मागच्या बाजूला गोलाकार कॅमेरा मॉड्यूलसोबत येतो. ज्यात 13MP चा सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: टॅबलेटला पावर देण्यासाठी कंपनीने यात 8300mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. याला चार्ज करण्यासाठी 35W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
  • ओएस: सॉफ्टवेअरनुसार HONOR Pad 9 अँड्रॉइड 13 आधारित मॅजिक ओएस 7.2 वर आधारित ठेवण्यात आला आहे.

HONOR Pad 9 ची किंमत (जागतिक)

  • HONOR Pad 9 ला यूकेमध्ये प्रारंभिक किंमत EUR 349 म्हणजे जवळपास 31,358 रुपयांमध्ये सादर करण्यात आले आहे. हा किबोर्ड अ‍ॅक्सेसरी किंवा त्याच्याव्यतिरिक्त पण येऊ शकतो.
  • हा यूके आणि आयरलँडमध्ये अनेक ऑनलाईन आउटलेट्सच्या माध्यमातून डिस्काऊंट ऑफर्ससह विकला जाईल.
  • कलर ऑप्शन पाहता ऑनर पॅड 9 स्पेस ग्रे आणि सियान लेक सारखे दोन कलरमध्ये जागतिक बाजारात उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here