Home टिप्स अँड ट्रिक्स या सोप्प्या टिप्स वापरून ऑनलाइन चेक करा पीएफ बॅलेंस

या सोप्प्या टिप्स वापरून ऑनलाइन चेक करा पीएफ बॅलेंस

जर तुम्हीही जॉब करत असाल आणि तुमची कंपनी पगारातून पीएफ (प्रोविडेंट फंड) कापत असेल तर त्याची माहिती ठेवणे आता खूप सोप्पे झाले आहे. आता तुम्ही घर बसल्या ऑनलाइन यावर नजर ठेऊ शकता कि तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले आहेत. पीएफ अकाउंट मध्ये जमा पैसा रिटायरमेंट च्या आधी न काढलेले बरे. पीएफ अकाउंट मध्ये किती पैसे जमा आहेत हे नियमितपणे बघणे केव्हाही चांगलेच. ऑनलाइन याबद्दल माहिती घेता येते. यासाठी तुम्हला काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

ऑनलाइन अशाप्रकारे चेक करा प्रोविडेंट फंड बॅलेंस

-तुमच्या प्रोविडेंट फंड मध्ये किती पैसा जमा झाले आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ईपीएफओ च्या वेबसाइट वर लॉग इन करावे लागेल.
-वेबसाइट वर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधी रजिस्टर (रजिस्टर केले नसेल तर) करावे लागेल.

-यासाठी तुमचे नाव, मेल आईडी, फोन नंबर आणि यूएएन नंबर हवा.

-एकदा रजिस्टर केल्यानंतर तुमच्या फोनवर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल, तो सबमिट करा.
-यानंतर तुमच्या फोन नंबरवर पीएफ अकाउंट चा पासवर्ड येईल.
-पासवर्ड आल्यानंतर तुम्ही यूएएन नंबरने लॉग इन करू शकता. 

-साइट वर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही खात्याचे पासबुक बघू शकता आणि हवा असल्यास तो डाउनलोड पण करू शकता. तुमच्याकडून आणि कंपनीकडून किती पैसे पीएफ अकाउंट मध्ये ट्रांसफर केले जात आहेत हे देखील तुम्ही बघू शकता. 
लक्षात असू दे कि पासबुक अपडेट व्हायला काही दिवस लागू शकतात. त्यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटचा बॅलेंस चेक करू शकाल.
तुम्ही तुमचा यूएएन म्हणजे यूनिवर्सल अकाउंट नंबर तुमच्या ऑफिसच्या अकाउंट डिपार्टमेंट किंवा तुमच्या सॅलरी स्लीप वरून घेऊ शकता. ईपीएफओ ने साल 2014 मध्ये यूएएन ची सुरवात केली होती. यूएएन च्या माध्यमातून पीएफ संबंधित सर्व माहिती मिळवू शकता तेही अगदी सहज.