अँड्रॉइड फोनवर कशी करायची Screen Record, अशा आहेत ट्रिक्स

मोबाइलमध्ये स्क्रीन रेकॉर्ड (Screen Record) उपयुक्त फीचर आहे. तुम्ही ऑनलाइन मीटिंगचा काही भाग भविष्यात पाहण्यासाठी साठवून ठेवायचा असेल किंवा मजेदार व्हिडीओची छोटीसी क्लिप सेव्ह करायची असेल तर हे फीचर वापरता येईल. चला जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही अँड्रॉइड फोनवर स्क्रीन रेकॉर्ड करू शकता.

Android Device वर स्क्रीन रेकॉर्ड करण्याची पद्धत

अँड्रॉइड फोन (अँड्रॉइड 10 किंवा त्यावरील) मध्ये बिल्ट-इन स्क्रीन रेकॉर्डर फीचर आहे. जर तुमच्याकडे जुना अँड्रॉइड डिवाइस असेल तर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. स्क्रीन रेकॉर्डसाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप फॉलो कराव्या लागतील:

स्टेप-1 : अँड्रॉइड डिवाइसचा क्विक सेटिंग्स पॅनल अ‍ॅक्सेस करण्यासाठी स्क्रीनला वरच्या बाजूने खालच्या बाजूला दोनदा स्वाइप करा. तिथे Screen Record टाइल दिसेल. जर नाही दिसली तर डावीकडे स्वाइप करा.

स्टेप-2 : त्यानंतरही तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डची टाइल दिसली नाही तर सर्व टाइल्स बघण्यासाठी पेन्सिल आयकॉनवर टॅप करा.

स्टेप-3 : स्क्रीन रेकॉर्डचा ऑप्शन दिसल्यानंतर त्यावर टॅप करा. इथे तुम्हाला None, Media, Media and mic चा ऑप्शन दिसेल.

स्टेप-4 : जर तुम्हाला मीडियासह ऑडियो देखील रेकॉर्ड करायचा असेल तर Media and mic वाल्या ऑप्शनवर क्लिक करू शकता.

नोट : स्क्रीन रेकॉर्डिंग दरम्यान स्क्रीनवरील सर्व माहिती स्क्रीन रेकॉर्डर अ‍ॅक्सेस करू शकतो, ज्यात जिनमें पासवर्ड, पेमेंट डिटेल, पिक्चर, मेसेज इत्यादींचा समावेश असू शकतो.

स्टेप-5 : स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी शो टॅप्स अँड टचेज वॉल टॉगल ऑन करा किंवा थेट स्टार्ट रेकॉर्डिंग असलेल्या ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप-6 : त्यानंतर काउंटडाउन (countdown) स्क्रीनवर दिसेल. मग रेकॉर्डिंग सुरु होईल.

स्टेप-7 : स्क्रीन रेकॉर्डिंग दरम्यान वर उजवीकडे पॉज आणि स्टॉपचा ऑप्शन दिसेल. रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर तिथून स्टॉप देखील करू शकता.

स्टेप-8 : स्क्रीन रेकॉर्डिंग फोन गॅलरीमध्ये सेव्ह होईल, जिथून तुम्ही ती अ‍ॅक्सेस आणि एडिट देखील करू शकता.

थर्ड पार्टी अ‍ॅप द्वारे कशी करायची स्क्रीन रेकॉर्डिंग

जर तुम्ही जुना अँड्रॉइड डिवाइस वापरत असाल तर स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी Screen Recorder-AZ Recorder अ‍ॅपची मदत घेऊ शकता. जो गुगल प्ले स्टोरवरून 50 मिलियन पेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्याचा वापर :

स्टेप-1 : सर्वप्रथम Google Play Store वरून AZ स्क्रीन रेकॉर्डर अ‍ॅप डाउनलोड करा. इंस्टॉल केल्यावर पुन्हा अ‍ॅप लाँच करा. ऑन-स्क्रीन निर्देश फॉलो करा.

स्टेप-2 : स्क्रीनवर आयकॉनची एक सीरीज दिसेल ह्यात एक लाल आणि पाच छोटे सफेद आयकॉन दिसतील. सफेद आयकॉनवर टॅप करा, ज्यात लाल कॅमेरा आयकॉन दिसेल.

स्टेप-3 : आता ‘स्टार्ट नाऊ’ वर टॅप करा. स्क्रीन रेकॉर्डिंग सुरु होईल.

स्टेप-4 : जेव्हा तुमची रेकॉर्डिंग पूर्ण होईल तेव्हा स्क्रीन वरून खालच्या बाजूला स्वाइप करा. एक छोटा AZ रेकॉर्डर मेनू बार दिसेल. ज्यात तुम्हाला पॉज आणि स्टॉपचे आयकॉन दिसतील. त्यातील स्टॉपवर क्लिक केल्यावर तुमचा व्हिडीओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल.