Home टिप्स अँड ट्रिक्स लॅपटॉपवर Screenshot कसा काढायचा, जाणून घ्या पद्धत

लॅपटॉपवर Screenshot कसा काढायचा, जाणून घ्या पद्धत

बऱ्याचदा तुम्ही तुमच्या मोबाइलवर स्क्रीनशॉट कॅप्चर केला असेल जे खूप सोपं काम आहे. परंतु स्क्रीनशॉट जेव्हा लॅपटॉपवर कॅप्चर कसा करायचा हे अनेकांना माहित नसतं. त्यामुळे Windows/macOS लॅपटॉप वापरणारे लोक कॅमेरा किंवा मोबाइल शोधू लागतात, ज्यात फोटो क्लियर न आल्यामुळे त्यांचं काम देखील होत नाही. त्यामुळे कोणत्याही Laptop (How to take screenshots on a laptop) वर स्क्रीनशॉट कसा काढायचा हे माहित असणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊया लॅपटॉपवर स्क्रीनशॉट घेण्याची पद्धत.

लक्षात असू दे पीसी वर स्क्रीनशॉट घेण्याच्या स्टेप सॉफ्टवेयर नुसार वेगवेगळ्या असतात. विंडोज आणि मॅक ओएस लॅपटॉपवर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि कमांड आहेत आणि जर त्या माहित नसतील तर संशय येऊ शकते. पुढे आम्ही विंडोज 10 / विंडोज 7 लॅपटॉप किंवा पीसी आणि macintosh वर स्क्रीनशॉट घेण्याची माहिती दिली आहे.

विंडोज 10 लॅपटॉप / पीसीवर स्क्रीनशॉट कसा काढायचा

विंडोज 10-पावर्ड लॅपटॉप / पीसीवर स्क्रीनशॉट घेण्याच्या अनेक पद्धती आहेत. विंडोज 7 लॅपटॉपवर स्क्रीनशॉट घेण्याची पद्धत सारखीच आहे. चला जाणून घेऊया.

1. अ‍ॅपच्या मदतीनं Windows 7/ 10 लॅपटॉपवर स्क्रीनशॉट

Windows 10 आणि Windows 7 दोन्हीवर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी एक डेडिकेटिड अ‍ॅप्लिकेशन आहे, ज्याला ‘Snipping Tool’ म्हणतात. ह्या अ‍ॅपच्या मदतीनं घेतलेले स्क्रीनशॉट तुमच्या फाइल्समध्ये इमेज स्वरूपात सेव्ह होतात.

2. Windows लॅपटॉपवर प्रिंट स्क्रीनच्या मदतीनं स्क्रीनशॉट घ्या

अ‍ॅप व्यतिरिक्त Windows लॅपटॉपमध्ये ‘PrtScn’ key च्या मदतीनं देखील स्क्रीनशॉट घेता येतो. ह्या ऑप्शन द्वारे दोन्ही Windows 10/ 7-पावर्ड लॅपटॉपवर स्क्रीनशॉट घेता येतो.

3. Alt+PrtScnच्या मदतीनं अ‍ॅक्टिव्ह window वर स्क्रीनशॉट कॅप्चर करा

4. एक पोर्शन कॅप्चर करण्यासाठी Windows key+Shift+S

5. Windows key+PrtScn च्या मदतीनं थेट सेव्ह करा स्क्रीनशॉट

6. Windows key+G द्वारे स्क्रीनशॉट

macOS laptops/ PCs वर कैसे लें स्क्रीनशॉट

macOS मध्ये देखील अनेक ऑप्शन आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही सहज स्क्रीनशॉट घेऊ शकता, ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

1. Command+Shift+3

macOS laptops/ PCs मध्ये Command+Shift+3 एकत्र प्रेस करा त्यामुळे सहज स्क्रिनशॉट घेता येईल. अशाप्रकारे संपूर्ण स्क्रीन कॅप्चर करता येईल.

2. Command+Shift+4

3. Command+Shift+5

4. Command+Shift+6

हा ऑप्शन फक्त टच बारसह येणाऱ्या MacBook व्हर्जनसाठी आहे.