व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कसं बनवायचं, इथे जाणून घ्या सोपी पद्धत आणि कसे करायचे कॉल-मेसेज

व्हॉट्सअ‍ॅप एक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे ज्यामुळे इंटरनेटद्वारे युजर्सना खाजगी किंवा ग्रुप टेक्स्ट मेसेज, व्हॉइस कॉल आणि तसेच व्हिडीओ कॉल सारखे फीचर्स मिळतात. हे मेसेजिंग अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्म वापरता येतं. दोन्ही युजर्स एकमेकांना मेसेज आणि कॉल देखील करू शकतात. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म युजर्सना आवडतो. जर तुम्ही अजूनही व्हॉट्सअ‍ॅप वापरलं नसेल तर आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कसं बनवायचं ह्याची माहिती देत आहोत.

व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कसं बनवायचं

स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप इंस्टॉल करा.

स्टेप 2 : त्यानंतर फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. इथे भाषा निवडल्यानंतर पुढील पेजवर व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी आणि शर्ती मान्य करून पुढे जा.

स्टेप 3 : पुढील पेजवर तुमचा फोन नंबर टाका. ह्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कंट्री (देश) म्हणून इंडिया निवडा. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ओळख पटवण्यासाठी फोन नंबरचा वापर केला जातो. तुम्ही फोन नंबरवरून इतर लोकांशी कनेक्ट करू शकता. तुमचा फोन नंबर कंफर्म करा आणि पुढे जा.

स्टेप 4 : तुमच्या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप एक ओटीपी पाठवेल. तो सबमिट करून व्हेरिफिकेशन प्रोसेस करा आणि तुमची माहिती व्हॉट्सअ‍ॅपला द्या.

स्टेप 5 : पुढील पेजवर व्हॉट्सअ‍ॅपला आवश्यक परवानग्या द्या. त्यानंतर तुमचं नाव अ‍ॅड करा. आवश्यक असल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचा फोटो लावून ‘डन’ बटनवर क्लिक करा.

तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट तयार आहे. आता तुम्ही तुमच्या फोनमधील सेव्ह कॉन्टेक्टशी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट आणि कॉलच्या माध्यमातून कनेक्ट करू शकता.

तुम्हाला जो फोन नंबर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटवर द्यायचा आहे तो अ‍ॅप असलेल्या फोनमध्ये असणं आवश्यक परंतु तो सक्रिय असणं आवश्यक आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशनचा ओटीपी तुम्हाला टाकावा लागेल. तसेच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटसाठी तुमच्या फोन नंबरवर इंटरनेट प्लॅन किंवा फोन वाय-फायशी कनेक्ट असणं आवश्यक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज, कॉल किंवा व्हिडीओ कॉल कसा करायचा

स्टेप 1: पहिल्यांदाच व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर मेसेज पाठवण्यासाठी होम बटनच्या खाली असलेल्या ‘सेंड मेसेज’ बटनवर क्लिक करा.

स्टेप 2 : इथे तुमच्या फोनमधील सेव्ह सर्व नंबर दिसतील जे व्हॉट्सअ‍ॅपवर आहेत. तुम्हाला ज्यांना मेसेज पाठवायचा असेल त्यांचा कॉन्टेक्ट सिलेक्ट करा.

स्टेप 3 : तो कॉन्टेक्ट निवडताच चॅट विंडो ओपन होईल. आता खाली दिलेल्या मेसेज बारमध्ये क्लिक करा आणि मेसेज टाइप करून सेंड बटन दाबा. अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल कसा करायचा?

स्टेप 1 : ज्या कॉन्टेक्टला व्हिडीओ कॉल करायचा असेल त्याच्या उजवीकडे असलेल्या कॅमेरा बटनवर क्लिक करा. तुम्हाला व्हिडीओ कॉल करायचा आहे हे कन्फर्म करण्यासाठी कॉलवर क्लिक करा.

स्टेप 2 : त्यानंतर कॅमेरा आणि माइक आणि इतर परवानग्या अ‍ॅपला द्या. परवानग्या दिल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल कसा करायचा?

कॉल करण्यासाठी वरील कॅमेरा आयकॉनच्या बाजूला असलेल्या फोन रिसिव्हर बटनवर क्लिक करा तुमचा ऑडियो कॉल सुरु होईल.