HP Smart Tank 580 Printer Review: छोट्या उद्योजकांसाठी बेस्ट प्रिंटर; प्रिंटिंग कॉस्ट कमी करण्यासाठी नवा पर्याय

HP Smart Tank 580: HP Smart Tank 580 Printer भारतात बजेट रेंजमध्ये काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं हा प्रिंटर 18, 848 रुपयांमध्ये सादर केला आहे. हा प्रिंटर नेक्स्ट लेव्हल प्रिंटिंग देतो असा दावा कंपनी केला आहे. गेला आठवडाभर आमच्याकडे हा प्रिंटर आहे आणि तो आम्ही वापरून पहिला आहे. आज आम्ही तुमच्यासाठी या दमदार प्रिंटरचा रिव्यु घेऊन आलो आहोत आणि यातून तुम्हाला समजेल की या प्रिंटरची खासियत काय आहे आणि या रेंजमध्ये हा प्रिंटर खरेदी करावा की नाही.

डिजाइन

HP smart tank 580 एक गुड लुकिंग प्रिंटर म्हणता येईल, जो कॉम्पॅक्ट डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. या प्रिंटरमध्ये तीन रंगांचा वापर करण्यात आला आहे. याचं स्कॅनिंग लीड लाइट ग्रे रंगाचं आहे तर बाजूला डार्क ग्रे कलर मिळतो आणि उर्वरित प्रिंटरसाठी व्हाईट कलर वापरण्यात आला आहे. टॉपला स्कॅनर लीड, कंट्रोल बटन्स आणि टास्क स्टेट्स दाखवण्यासाठी एक छोटा डिस्प्ले देण्यात आला आहे. बिल्ड क्वॉलिटीमध्ये कोणतीही तडजोड केल्याचं दिसत नाही. यासाठी मजबूत मटेरियल्सचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीनं यात रिसायकल्ड मटेरियल्सचा वापर केला आहे.

फ्रंटला प्रिंट ट्रे आहे जो फोल्ड करून प्रिंटरच्या बॉडीमध्ये ठेवता येतो. तर प्रिंटर फीडर टॉपला आहे, तोही फोल्डेबल डिजाईनसह येतो. त्याच्या बाजूला इंकचं स्टेटस दाखण्यासाठी चार पारदर्शी इंक टँक आहेत. या प्रिंटरच्या बॉक्समध्ये दोन ब्लॅक, एक येलो, एक स्यान आणि एक मजेंटा अशा पाच रंगाच्या इंक बॉटल्स मिळतात. सोबत एक कनेक्टर आणि यूएसबी केबल मिळते. प्रिंटर सोबत आलेला मॅन्युअल सेटअपमध्ये मदत करतो परंतु कंपनीच्या ‘एचपी स्मार्ट’ अ‍ॅपमधील अ‍ॅनिमेशनमुळे सेटअप आणखी सोपा होतो.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

हा प्रिंटर फक्त काही मिनिटांत सेटअप झाला आणि प्रिंटिंगसाठी रेडी होता. एचपी स्मार्ट अ‍ॅपच्या मदतीनं तुम्ही हा प्रिंटर तुमच्या वायफायशी कनेक्ट करू शकता आणि जगभरात कुठूनही तुम्ही या प्रिंटरला प्रिंटची कमांड देऊ शकता. बेस्ट कनेक्शनसाठी सेल्फ-हीलिंग वाय-फायचं फिचर देण्यात आलं आहे. तसेच वापरात नसताना हा प्रिंटर आपोआप बंद होतो आणि प्रिंट कमांड दिल्यावर चालू होतो, त्यामुळे विजेची बचत होते.

एचपीच्या या नवीन इंक टँक प्रिंटर्स सोबत ग्राहकांना मिळणाऱ्या पाच इंक बॉटल्स 18,000 ब्लॅक अँड व्हाईट पेजेस किंवा जवळपास 6,000 रंगीत पेजेस प्रिंट करू शकतात. हा प्रिंटर एका मिनिटाला 12 ब्लॅक अँड व्हाइट किंवा 5 रंगीत प्रिंट देऊ शकतो, इतका हा वेगवान आहे.

आम्हाला आवडलेल्या गोष्टी

काही दिवस वापरल्यानंतर हा प्रिंटर सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या गरजा बघून डिजाईन करण्यात आल्याचं समजलं. त्यामुळे कमी किंमतीत जास्त पेक्षा जास्त प्रिंटिंग केली जाऊ शकते. तसेच घरगुती वापरासाठी देखील हा एक चांगला प्रिंटर आहे. कारण हा प्रिंटर खूप वेगवान आणि अचूक प्रिंट्स देतो, हे रिव्यू दरम्यान दिसून आलं. प्रिंट्सची क्वॉलिटी देखील शानदार आहे.

विशेष म्हणजे या प्रिंटरमध्ये आयडी कार्ड्सच्या स्कॅनिंगसाठी खास बटन आहे. हे बटन दाबल्यानंतर तुम्ही स्कॅन एरियामध्ये कुठूही आयडी कार्ड ठेवला तरी प्रिंटर त्याला स्मार्ट पद्धतीने पानावर ठेवतो तसेच आयडी कार्डची दुसरी बाजू देखील एकाच कागदावर प्रिंट करण्यास मदत करतो, हे एक आम्हाला आवडलेलं फिचर आहे. गरज नसल्यास या प्रिंटरचा पेपर फिडर आणि प्रिंट ट्रे फोल्ड करता येतो, त्यामुळे जागा कमी लागते. तसेच प्रिंट कमांड देताच काही क्षणात प्रिंटिंग सुरु होते. HP Smart Tank 580 च्या या गोष्टी आवडल्या.

निष्कर्ष

जर तुम्ही एखादा छोटा उद्योग करत असाल आणि तुम्हाला वारंवार प्रिंटिंगची गरज असेल किंवा तुम्ही घरासाठी एखादा चांगला प्रिंटर शोधत असाल तर तुम्ही एचपी स्मार्ट टँक 580 प्रिंटर विकत घेऊ शकता. हा एक फायदेशीर सौदा ठरेल. हा प्रिंटर लाइटवेट आहे आणि खूप कमी जागा घेतो इतकेच नव्हे तर हा वायफायशी कनेक्ट होऊन वेगानं प्रिंट कमांड हाताळतो. प्रिंटच दर्जा देखील अव्वल आहे आणि खर्च देखील खूप कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here