Samsung Galaxy Buds 2 Pro रिव्यू: या क्वॉलिटीला तोड नाही!

जेव्हा चांगल्या क्वॉलिटीच्या TWS इअरबड्सचा विषय निघतो तेव्हा सर्वात आधी सॅमसंग आणि अ‍ॅप्पलचा उल्लेख केला जातो. गॅलेक्सी बड्स फक्त क्वॉलिटीमध्ये नव्हे तर यूजेबिलिटी आणि फीचर्सच्या बाबतीत देखील खूप शानदार आहेत. अलीकडेच कंपनीनं Samsung Galaxy Buds 2 Pro भारतीय बाजारात लाँच केले आहेत आणि यांची चर्चा जोरदार आहे. हा डिवाइस आमच्याकडेही आला आणि आम्ही जवळपास 2 आठवडे वापरल्यानंतर याचा रिव्यू लिहिला आहे जो तुम्ही पुढे वाचू शकता.

डिजाइन

सर्वप्रथम डिजाइन पाहता, जुन्या मॉडेलच्या तुलनेत Buds 2 Pro खूप बदलण्यात आले आहेत. कंपनीनं चौकोनी केसमध्ये हे सादर केले आहेत आणि ज्या रंगाची केस आहे त्याच कलरमध्ये इअरबड्स मिळतात, ही एक चांगली बाब आहे. कंपनीनं हे मॅट कोटिंगसह सादर केले आहेत, त्यामुळे तुम्ही हे कानात जेव्हा घालता तेव्हा हलत नाहीत आणि चांगल्या प्रकारे चिटकतात. ग्लॉसी डिजाइनपेक्षा हे खूप चॅनल आणि स्वच्छ वाटतात. हे देखील वाचा: Upcoming smartphones November 2022: वनप्लसच्या परवडणाऱ्या स्मार्टफोनसह ‘हे’ हँडसेट येत आहेत या महिन्यात, पाहा यादी

तसेच बड्स 2 पेक्षा हे थोडे छोटे झाले आहेत त्यामुळे कानाचा आकार कसाही असला तरी हे फिट होतात. हे इअरबड कानात असे फिट होतात की तुम्ही किती देखील मान हलवली तरी पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही जिममध्ये असाल, जॉगिंग करत असाल किंवा एखाद्या म्यूजिक पार्टीमध्ये देखील हे कानात अनकंफर्टेबल वाटत नाहीत.

जुन्या गॅलेक्सी बड्सचं वजन 6 ग्राम पेक्षा जास्त होतं. पंरतु यावेळी कंपनीनं वजन फक्त 5.5 ग्राम ठेवलं आहे. एक ग्राम तुम्हाला कमी वाटत असेल परंतु दीर्घकाळ वापर करणाऱ्यांना यातील फरक जाणवतो. केससह हे इअरबड 43.4 ग्रामचे आहेत.

Samsung galaxy buds 2 pro review in marathi

Samsung Galaxy Buds 2 Pro IPX7 सर्टिफाइड आहे. त्यामुळे कोणत्याही मौसमात हे सहज वापरता येतात. घाम किंवा पावसामुळे हे खराब होत नाहीत. हे घालून तुम्ही स्विमिंग पुलमध्ये देखील जाऊ शकता. एक मीटर पाण्यात हे 30 मिनिटे सुरक्षित राहू शकतात. एकंदरीत डिजाइनमध्ये तुम्हाला तक्रारीची संधी मिळणार नाही. हे देखील वाचा: 5G Supported Smartphones: या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर

हार्डवेयर

Samsung Galaxy Buds 2 Pro कंपनीनं 10mm साउंड ड्राईव्हरसह सादर केले आहेत आणि यात तुम्हाला 5mm चा ट्विटर मिळतो. हा कॉम्बिनेशन दोन्ही बड्समध्ये आहे. या इअरबडमध्ये 61 mAh ची बॅटरी मिळते तर केसमध्ये 515mAh ची बॅटरी आहे. कंपनीनं यात 6 माइक दिले आहेत. जे तुम्हाला एएनसी म्हणजे अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह अँबियन्त साउंड सारखे फीचर्स देतात. तसेच कंपनीनं एक्सेलेरोमीटर, जायरो सेन्सर, हॉल सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि टच सेन्सर देखील दिले आहेत. हार्डवेयर खूप अ‍ॅडव्हान्स आहे, असं म्हणता येईल. तसेच चार्जिंगसाठी तुम्हाला यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

Samsung galaxy buds 2 pro review in marathi

परफॉर्मन्स

परफॉर्मन्समध्ये सर्वप्रथम बॅटरी बद्दल बोलूया. कंपनीनं दावा केला आहे की हे इअरबड 3.5 तासांचा टॉक टाइम देऊ शकतात. तसेच केससह तुम्हाला 14 तासांचा टॉक टाइम मिळतो. हा बॅकअप तुम्हाला एएनसीसह मिळतो, ही चांगली बाब आहे. अर्थात जर तुम्ही ANC म्हणजे अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन बंद केलं तर बॅकअप वाढतो. ऑडियो प्लेबॅक पाहता इअरबडमधून 5 तासांचा बॅकअप मिळतो तर केससह 18 तासांचा प्ले टाइम आहे. हा चांगला आहे परंतु अजून चांगला होऊ शकला असता. केससह 20 तासांपेक्षा जास्त म्यूजिक प्ले टाइम असता तर तो चांगला म्हणता आला असता. चार्जिंगसाठी हे इअरबड 70 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतात. परंतु यात वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे , जी एक चांगली बाब आहे. तुमच्याकडे गॅलेक्सीचा हाय एन्ड फोन असेल तर तुम्ही त्यावर हे चार्ज करू शकता. हे खूप उपयोगी फीचर असलं तरी यात चार्जिंग खूप मंदगतीने होते. 30 मिनिटांत 25 टक्क्यांच्या आसपास चार्ज होतात.

Samsung galaxy buds 2 pro review in marathi

आता कॉलिंग फीचर्सवर येऊया जे तुम्हाला खूप इम्प्रेस करतील. हे इअरबड कानात चांगल्या प्रकारे अ‍ॅडजस्ट होतात आणि जर तुम्ही नॉइज कॅन्सलेशन ऑन केलं तर खूप कमी आवाज आत येतो. काही ठिकाणी थोडी समस्या आली परंतु बड्स अ‍ॅडजस्ट केल्यावर ती गेली. अँबियन्ट साउंड खूप चांगला चालतो. एखादी अनाउंसमेंट ऐकताना तुम्हाला खूप चांगला अनुभव मिळतो.

कॉलनंतर म्यूजिक बद्दल बोलूया जिथे वेगळाच एक्सपीरियंस मिळेल. काही लोक म्हणून शकतात की बेस थोडा कमी आहे. साउंड क्वॉलिटी खूप चांगली आहे. कंपनीनं यात टू वे स्पिकरचा वापर केला आहे जे 24 बिट्स हाय फाय ऑडियोला सपोर्ट करतात. त्यामुळे क्वॉलिटीशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. तसेच तुम्हाला 360 डिग्री ऑडियो सपोर्ट मिळतो. त्यामुळे तुम्ही थिएटरचा अनुभव घेऊ शकाल. तसेच सॅमसंगच्या अन्य ऑडियो प्रोडक्ट प्रमाणे हा डिवाइस देखील AKG इंटिग्रेशनसह येतो.

कंपनीनं हे एयरवेंटला सपोर्टसह सादर केले आहेत. त्यामुळे कानात हे इअरबड पूर्णपणे अ‍ॅडजस्ट झाल्यावर देखील कान जाम झाल्यासारखे वाटत नाहीत उलट हवा खेळती राहते. तसेच एयरपोर्ट किंवा स्टेशन्सवर बाहेरील सूचना ऐकण्यासाठी यातील अँबियन्ट साउंड फिचर चांगली मदत करतं. सॅमसंग गॅलेक्सी बड्स 2 प्रो कंपनीनं ब्लूटूथ 5.3 वर सादर केले आहेत आणि यात ऑडियोसाठी HiFi,AAC आणि SBC सह अन्य फॉर्मेटचा सपोर्ट मिळतो.

स्मार्ट फीचर

Samsung Galaxy Buds 2 Pro मध्ये तुम्हाला साधारण टॉप टू आन्सर कॉल व्यतिरिक्त वॉल्यूम कंट्रोलसह अन्य फीचर्स मिळतात. तसेच कंपनीनं यात काही खास फीचर्स दिले आहेत, ज्यामुळे वापर सोपा होता. जसे की केस ओपन करताच सॅमसंग फोन हे डिटेक्ट करतात आणि तुमच्या फोनवर पॉपअप मेसेज येतो. इथे फक्त काही क्लिकमध्ये हा डिवाइस तुमच्या फोनशी कनेक्ट होतो. इतकेच नव्हे तर तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीनुसार हे स्वतःहून फोन, टॅबलेट आणि वॉचवर शिफ्ट होतात.

जर तुम्ही टीव्ही पाहत असाल आणि टीव्हीशी तुमचे बड कनेक्टेड असतील तर कॉल आल्यावर फोनचा वापर करण्याची गरज नाही. फक्त डबल टॅप करून कॉल इअरबडवर घेता येतो. सॅमसंग फोन व्यतिरिक्त हे तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस डिवाइससह पेयर करू शकता. परंतु अन्य डिवाइसवर तेवढे फीचर्स मिळत नाहीत जितके सॅमसंग फोनवर मिळतात. यातील फाइंड माय इअरबड्स फीचर देखील चांगलं आहे. जर चुकून तुम्ही तुमचे टीडब्लूएस एखाद्या ठिकाणी ठेवले तर फोनवर्ण फाइंड माय इअरबड्सच्या माध्यमातून हे शोधू शकता.

निष्कर्ष

Samsung galaxy buds 2 pro review in marathi

Samsung Galaxy Buds 2 Pro बाबत सर्वकाही जाणून घेतल्यानंतर जेव्हा किंमतीचा विषय निघतो तेव्हा हे इअरबड्स 17,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहेत. प्राइस थोडी जास्त आहे परंतु प्रीमियम ग्रेड TWS साठी इतके पैसे मोजावे लागतात. हे पूर्णपणे वॉटरप्रूफ आहेत. साउंड क्वॉलिटी प्राइस सेगमेंटमध्ये सर्वात बेस्ट म्हणता येईल. बेस थोडा कमी परंतु इंट्रूमेंट्सचा आवाज ज्याप्रकारे येतो तो ऐकल्यानंतर हे लवकर कानातून काढावे वाटत नाहीत. यांना पर्याय म्हणून तुम्ही New Apple AirPods थर्ड जेनरेशन, LG Tone Free FP9 आणि Sony Link Buds WF L900 चा विचार करू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here