हुआवई येत्या 26 जुलै ला भारतात आपला नवीन डिवाईस सादर करणार आहे. शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर हुआवई चा आगामी स्मार्टफोन लिस्ट पण झाला आहे. ज्या वरून समजले आहे की कंपनी भारतात आपल्या ‘नोवा स्मार्टफोन सीरीज’ ची सुरवात करणार आहे. इंडिया लॉन्च च्या एक आठवडा आधी हुआवई ने आपल्या या स्मार्टफोन ला अंर्तराष्ट्रीय मंचावरून चीन मध्ये लॉन्च केले आहे. हुआवई ने चीनी बाजारात कंपनी चा नवीन स्मार्टफोन हुआवई नोवा 3आई लॉन्च केला आहे.
हुआवई नोवा 3आई कंपनी ने सादर केलेल्या नोवा 3 स्मार्टफोन चा हल्का मॉडेल आहे. नोवा 3आई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.
नोवा 3आई ला हुआवई ने ईएमयूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले आहे. नोवा सीरीज चा हा लेटेस्ट फोन आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत हुआवई च्या हाईसिलिकॉन किरीन 710 चिपसेट वर चालतो. कंपनी ने हा फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे जे 4जीबी रॅम व 6जीबी रॅम ला सपोर्ट करतात. तर स्टोरेज आॅप्शन मध्ये 4जीबी रॅम/128जीबी मेमरी, 6जीबी रॅम/64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरी वेरिएंट कंपनी ने सादर केले आहेत.
हुआवई नोवा 3आई फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण खास आहे. हा फोन 4 कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल आणि फ्रंट पॅनल दोन्हीकडे डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर कंपनी ने फोन च्या फ्रंट पॅनल वर 24-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा सेटअप दिला आहे.
नोवा 3आई च्या रियर कॅमेरा मध्ये एआई टेक्नोलॉजी आहे तर फोन च्या बॅक आणि फ्रंट दोन्ही कॅमेरा मधून बोके इफेक्ट वाले फोटो क्लिक करता येतील. हुआवई चा हा नवीन फोन कंपनी च्या लेटेस्ट जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,340एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
हुआवई नोवा 3आई ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू ह्यू कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. किंमत पाहता फोन चा 4जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंट 1,99 युआन (जवळपास 20,400 रुपये) आणि 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 2,199 युआन (जवळपास 20,400 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. भारतात हा फोन 26 जुलै ला लॉन्च होणार आहे. देशात फोन ची किंमत किती असेल यासाठी लॉन्च ची वाट बघितली जात आहे.