ऑगस्ट महिन्यात हुआवईचा एक स्मार्टफोन गूगल पेज वर Huawei P Smart Pro नावाने लिस्ट झाला होता. या लिस्टिंग मध्ये फोनचे फोटो आणि काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. या लिस्टिंग नंतर कंपनीने स्मार्टफोनचा उल्लेख केला नाही केला किंवा फोनच्या लॉन्च संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही. पण आज बातमी समोर येत आहे कि हुआवईने आपला हा नवीन स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात आणला आहे. Huawei P Smart Pro यूरोपियन बाजारात लॉन्च केला गेला आहे.
Huawei P Smart Pro यूरोपियन देशांत लॉन्च केला गेला आहे जिथे हा फोन एकाच वेरिएंट मध्ये आला आहे. Huawei P Smart Pro गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Huawei P Smart चा अपग्रेडड वर्जन आहे. फोनच्या डिजाईन बद्दल बोलायचे तर हा डिवाईस पॉप-अप मॅकेनिज्म वर बनला आहे. फोन मध्ये फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. तर फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल मध्ये शेप मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Huawei P Smart Pro च्या साईड पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन आहे.
Huawei P Smart Pro
हुआवईच्या या नवीन फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Huawei P Smart Pro 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 9.1 वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 710 चिपसेट वर चालतो.

Huawei P Smart Pro यूरोप मध्ये 6 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Huawei P Smart Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.
त्याचबरोबर Huawei P Smart Pro च्या बॅक पॅनल वर एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे जी 120डिग्री फिल्ड व्यू ला सपोर्ट करते. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या पॉप-अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Huawei P Smart Pro एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि 3.5एमएम जॅक सोबतच पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. यूरोप मध्ये Huawei P Smart Pro स्मार्टफोन मीडनाईट ब्लॅक आणि ब्रिदिंग क्रिस्टल कलर मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत भारतीय करंसीनुसार 25,000 रुपयांच्या आसपास आहे.















