How to File ITR Online: इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल करण्याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. 31 जुलै आयटीआर फाईल (ITR Filing) करण्याची शेवटची आखिरी तारीख (ITR Filing Last Date) आहे. शेवटची तारीख जवळ असताना देखील डेडलाईन पुढे ढकलण्याचा सरकारचा कोणताही मनसुबा दिसत नाही. जर तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नला ऑडिटची आवश्यकता नसेल तर तुम्ही शेवटच्या तारखेआधी रिटर्न फाईल करणं आवश्यक आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत तुमचं आयटीआर फाईल केलं नसेल आणि कसं रिटर्न फाईल करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर पुढे आम्ही आयटीआर फाईल करण्याची स्टेप-बाए-स्टेप प्रोसेस सांगितली आहे.
2022-23 साठी Income Tax Return (ITR) ची शेवटची तारीख या आठवड्यात रविवार 31 जुलै आहे. जर तुम्ही डेडलाईन वाढवून मिळेल असा विचार करत असाल तर सरकारनं अशी कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही. त्यामुळे दंड वाचवायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा आयटीआर फाईल केला पाहिजे. विशेष म्हणजे यात प्रक्रियेत फक्त 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन ऐवजी रिटर्न ऑफलाईन भरण्याची सूट देण्यात आली आहे.
तुम्हाला तर माहित आहे की सरकारनं एक नवीन इन्कम टॅक्स पोर्टल सादर केलं आहे जे तुम्हाला सहज आयटीआर फाईल करण्यास मदत करतं. याचा वापर एकाच वेळी अनेक युजर्ससाठी देखील करता येतो आणि इंटरॅक्टिव्ह असल्याचा दावा केला जातो. इतकेच नव्हे तर नवीन आयटीआर पोर्टल पटकन रिटर्न फाईल करण्यात तुमची मदत करतो. चला जाणून घेऊया ऑनलाइन आयटीआर कसं भरायचं.
ITR फाईल झाल्यानंतर तुम्हाला रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ई-व्हेरिफाय करावं लागेल. असं न केल्यास “एक आयटीआर अमान्य ठरवलं जातं.” चला जाणून घेऊया आयटीआर ई-व्हेरिफाय करण्याची पद्धत. सर्वप्रथम इनकम टॅक्स की ई-फाईलिंग वेबसाईटवर जा.