मेक इन इंडिया चे मोठे पाऊल, मोबाईल नंतर आता बॅटरी पण बनेल भारतात

भारत सरकार च्या महत्वकांक्षी योजना मेक इंडिया अंतर्गत आता पर्यंत अनेक मोठ्या मोबाईल कंपन्यांनी आपली फॅक्टरी भारतात सेट केली आहे. असे असूनही हा आरोप केला जातो की भारतात फोन फक्त असेंबल होतात इथे कंपोनंट्स ची निर्मिती होत नाही. पण आता भारतात मोबाईल कंपोनंट्स च्या निर्मितीत मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. आता भारतातच लिथियम आॅयन बॅटरी ची निर्मिती सुरू होणार आहे. यासाठी मुनोथ इंडस्ट्रीज आंध्र प्रदेशातील शहर तिरुपती मध्ये आपला पहिला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारणार आहे. देशात लिथियम आॅयन बॅटरी चा हा प्लांट भारत सरकार आणि इंडियन सेल्युलर एसोसिएशन च्या सहयोगाने उभारण्यात येणार आहे.

लिथियम-ऑयन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट ची घोषणा करताना मुनोथ इंडस्ट्रीज चे चेअरमन जसवंत मुनोथ ने सांगितले की या प्लांट साठी 799 करोड रूपयांची इनवेंस्टमेंट केली जाईल. कंपनी ही इनवेस्टमेंट तिन टप्प्यांमध्ये करेल. तसेच पाहिल्या टप्प्यात जवळपास 1,700 लोकांना रोजगाराची संधी मिळेल.

what is lithium ion battery and battery history

तसेच कंपनी ने ही पण माहिती दिली आहे की सुरवातीला प्लांट मधून प्रामुख्याने स्मार्टफोन च्या बॅटरी ची निर्मिती होईल त्यानंतर लॅपटॉप्स, सहित दुसर्‍या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची आणि हेल्थ सेक्टर मधील उपकरणांसाठी लिथियम ऑयन बॅटरी ची निर्मिती केली जाईल.

91मोबाईल्स शी बोलताना जसवंत मुनोथ ने सांगितले की प्लांट पुढील वर्षी मार्च पर्यंत सेटअप होईल आणि लिथयम बॅटरी ची निर्मिती एप्रिल 2019 पासून सुरू होईल. तसेच त्यांनी हे पण सांगितले की पाहिल्या फेज मध्ये 2 लाख एमएच लिथिय​म बॅटरी ची निर्मिती होईल जी भारतातील एकूण लिथियम बॅटरी वापराच्या फक्त 6 टक्के आहे. पण दुसर्‍या आणि तिसर्‍या फेज मध्ये प्रोडक्शन अनेक पटीने वाढवला जाईल.

तसेच यावेळी इंडियन सेल्युलर एसोसिएशन चे अध्यक्ष पंकज मोहिन्द्रू ने सांगितले आहे की सध्या भारतात बॅटरी इंपोर्ट होत आहेत अशात मेक इन इंडिया च्या दिशेने ही खुप मोठे पाऊल आहे. इतकेच नव्हे तर इंपोर्ट केल्यामुळे बॅटरी ची किंमत खुप वाढते. त्यामुळे मेड इन इंडिया नंतर किंमत कमी होईल आणि याचा परिणाम मोबाईर फोन च्या किमतींवर होईल.

त्यांनी पुढे सांगितले की हा प्लांट भारत सरकार च्या मेक इन इंडिया कार्यक्रम अंतर्गत उभारला जात आहे आणि भारत सरकारची यात 25 टक्क्यांची भागीदारी असेल.

विशेष म्हणजे आजकाल मोबाईल आणि लॅपटॉप व्यतिरिक्त अनेक उपकरणां मध्ये लिथियम बॅटरी चा वापर होतो. तसेच अमेरिकन मोटर कंपनी टेस्ला लिथियम बॅटरी वर चालणारी कार पण बनवते. त्यामुळे भारतात लिथियम आयन बॅटरी ची निर्मिती झाल्यामुळे बॅटरी वर चालणार्‍या गाड्यांच्या निर्मिती पण होताना दिसू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here