India vs England Semi Final live match score: T20 World Cup 2022 ची दुसरी सेमी-फायनल मॅच India आणि England दरम्यान खेळवली जाणार आहे. भारत आणि इंग्लड दरम्यान ही मॅच आज म्हणजे गुरुवारी 10 नोव्हेंबर 2022 ला ऑस्ट्रेलियामधील एडिलेडमध्ये खेळवली जाईल. इथे आम्ही तुम्हाला या मॅचच्या लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला भारत आणि इंग्लड दरम्यान होणारी महत्वाची सेमी फायनल कुठे लाइव्ह बघता येईल, तसेच मोबाइलवर लाइव्ह स्ट्रीम पाहण्यासाठी काय करावं लागेल हे सांगणार आहोत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिली सेमी फायनल मॅच पाकिस्तान आणि न्यूजीलँड दरम्यान पार पडली आहे.
India vs England Semi Final live match score:
भारत आणि इंग्लड India vs England (IND vs ENG) दरम्यान ICC T20 World Cup सेमीफायनल मॅच गुरुवारी 10 नोव्हेंबरला खेळवली जाईल. ही मॅच ऑस्ट्रेलियामधील एडिलेड येथील ओव्हल स्टेडियममध्ये खेळली जाईल. सुपर 12 च्या दोन ग्रुप पैकी ग्रुप 1 मध्ये इंग्लडची टीम दुसऱ्या स्थानावर होती आणि भारतीय संघानं आपल्या ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थान मिळवलं होतं. आता फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला इंग्लडला हरवावं लागेल. हे देखील वाचा: Ayushman Bharat Card Download: आयुष्मान भारत कार्ड घर बसल्या करा डाउनलोड, 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत
Catch all the LIVE action on DD Sports ?(DD Free Dish & DTT Platforms)#T20WorldCup | #TeamIndia | #MenInBlue https://t.co/B8VpNuPxRb
— Doordarshan Sports (@ddsportschannel) October 22, 2022
India vs England (IND vs ENG) T20 World Cup semifinal मॅच टाइमिंग
भारत आणि इंग्लॅग्ड मधील टी20 वर्ल्डकपची 2022 सेमी फायनल मॅच उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरु होईल. या मॅचची नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल.
Four teams remain ?
It all begins at the SCG ?#T20WorldCup pic.twitter.com/wveJcXbXse
— ICC (@ICC) November 8, 2022
India vs England (IND vs ENG) T20 World Cup सेमीफायनलचे थेट प्रक्षेपण
India vs England T20 World Cup सेमीफायनल मॅच भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर लाइव्ह बघता येईल. स्टारनं विविध भाषांमध्ये कॉमेंट्री देखील उपलब्ध केली आहे. तुम्ही ऑनलाईन देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकता. आयसीसी टी20 वर्ल्ड कपची दुसरी सेमीफायनल मॅच India vs England (IND vs ENG) भारतात ऑनलाइन Disney Plus Hotstar वर बघता येईल. यासाठी तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापर करू शकता, परंतु यासाठी तुमच्याकडे हॉटस्टारचं सब्सस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे. हे देखील वाचा: 694 रुपये द्या आणि घरी आणा 40 इंचाचा Smart TV; जाणून घ्या ऑफर
पाकिस्तान फायनलमध्ये
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल मॅच पाकिस्तान आणि न्यूजीलँड दरम्यान खेळवण्यात आला आहे. या मॅचमध्ये पाकिस्ताननं न्यूजीलँडला 7 विकेट हरवलं आहे. न्यूजीलँडनं पहिली बॅटिंग करून 152 रन बनवले होते, तर पाकिस्ताननं 5 बॉल्स राखून हा सामना जिंकला. जर भारतानं सेमी फायनलमध्ये इंग्लडला हरवलं तर आपल्याला पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानचा थरारक सामना पुन्हा बघता येईल.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
