Realme Smart TV X वर डिस्काउंट ऑफर; ईएमआयचा ऑप्शन देखील उपलब्ध

तुम्हाला तुमच्या घरातील जुना टीव्ही अपग्रेड करायचा आहे का? जर तुम्ही नवीन टीव्ही शोधत असाल तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर Realme चा दमदार 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही अत्यंत स्वस्तात विकला जात आहे. कंपनी Realme Smart TV X Full HD स्मार्ट टीव्हीवर 12,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. तसेच Smart TV वर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Realme Smart TV फक्त 694 रुपये देऊन घरी घेऊन येत येईल. हा स्मार्ट टीव्ही भारतीयांना इतका आवडला आहे की त्यांनी फ्लिपकार्टवर टीव्हीला 4.3 रेटिंग दिलं आहे. चला जाणून घेऊया या टीव्हीवर मिळणाऱ्या ऑफर आणि किंमतीची सविस्तर माहिती.

Realme Smart TV X Full HD ची किंमत आणि ऑफर्स

फ्लिपकार्टवर Realme Smart TV X Full HD ची एमआरपी 31,999 रुपये आहे. ज्यावर सध्या 37 टक्के म्हणजे 12,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत या Realme स्मार्ट टीव्हीवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून मिळेल. तसेच, जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही विकू इच्छित असाल तर स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला 11,000 रुपये पर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल.

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अन्य बँक हा टीव्ही 694 रुपयांच्या EMI ऑप्शन वर विकत घेण्याची संधी देत आहेत. ज्याच्या मदतीनं 3 ते 36 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर हा स्मार्ट टीव्ही को विकत घेता येईल. ज्यात फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुम्हाला 36 महिन्यांसाठी फक्त 694 रुपयांची EMI ऑफर करत आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला 13GB RAM असलेला स्वस्त 5G फोन; मीडियाटेकच्या चिपसेटसह एंट्री

Realme Smart TV X Full HD Specifications

Realme स्मार्ट टीव्हीचे फीचर्स पाहता यात युजर्सना 40 इंचाचा Full HD डिस्प्ले मिळतो. ज्यात 60Hz रिफ्रेश रेट आणि 1920 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन आहे. चंफल्य ऑडियोसाठी 24 वॉट क्वॉड स्पिकर मिळतात. स्पिकरमध्ये डॉल्बी ऑडियो टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G31 MP2 आहे तर प्रोसेसरच्या बाबतीत डिवाइसमध्ये Quad Core ARM Cortex A55 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या रियलमी टीव्हीमध्ये 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज मिळते. OS पाहता हा टीव्ही अँड्रॉइड ओएसवर चालतो. तसेच चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये एचडीएमआय, यूएसबी आणि वायफाय सारख्या सुविधा आहेत. हे देखील वाचा: कमालाच झाली! खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 16GB रॅम; Realme 10 च्या एंट्रीमुळे रेडमीची डोकेदुखी वाढली

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here