Ayushman Bharat Card Download: आयुष्मान भारत कार्ड घर बसल्या करा डाउनलोड, 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत

Ayushman Bharat Card Download: केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाची योजना आयुष्मान भारतच्या माध्यमातून देशातील नागरिकांना आरोग्य सेवा मोफत दिल्या जातात. या योजनाच्या माध्यमातून नागरिक सरकारी आणि प्रायव्हेट इस्पितळांमध्ये आपला उपचार मोफत करू शकतात. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साल 2018 मध्ये लाँच केली होती. या योजनेअंतगर्त देशातील कोट्यवधी लोकांना मोफत उपचार मिळत आहे. आयुष्मान कार्ड धारकांना सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत मिळतात.

या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड बाबत माहिती देणार आहोत. जर तुम्ही आयुष्मान भारत योजनेस पात्र असाल तर कशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, याची माहिती पुढे देण्यात आली आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला आयुष्मान भारत कार्डची पात्रता चेक करण्याची आणि हे कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत सांगितली आहे.

आयुष्मान भारत कार्डची पात्रता कशी चेक करायची

आयुष्मान भारत कार्डची पात्रता चेक करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जावं लागेल. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे की कशाप्रकारे तुम्ही आयुष्मान भारत कार्डची पात्रात चेक करू शकता.

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला mera.pmjay.gov.in वेबसाइटवर जावं लागेल. इथे तुम्हाला तुमचा फोन नंबर, कॅप्चा कोड टाकून लॉगइन करावं लागेल. लॉगइन केल्यावर तुम्हाला योजनेच्या पात्रातेची माहिती मिळेल.

स्टेप 2: त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचं राज्य टाकून विचारलेली सर्व माहिती भरून तुमची पात्रता जाणून घेता येईल.

नोट: पंतप्रधान जन आरोग्य योजना केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना काही राज्यांत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वप्रथम ही योजना तुमच्या राज्यात लागू आहे की नाही ते तपासून घे.

आयुष्मान भारत कार्ड कसं डाउनलोड करायचं

जर तुमच्या राज्यात आयुष्मान भारत योजना लागू असेल आणि तुम्ही आयुष्मान भारत योजनेस पात्र असाल तर तुम्ही घर बसल्या हे कार्ड डाउनलोड करू शकता. इथे आम्ही तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत सांगणार आहोत.

स्टेप 1: आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी https://bis.pmjay.gov.in/BIS/selfprintCard लिंक ओपन करा.

स्टेप 2: इथे तुम्हाला आधार कार्डवर क्लिक करण्यास सांगितलं जाईल. त्यासाठी सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर जनरेट OTP वर क्लिक करा.

स्टेप 3: OTP दिल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्मान कार्डची पीडीएफ फाईल डाउनलोड होईल. हे कार्ड सोबत बाळगून तुम्ही आयुष्मान भारतच्या पॅनलमधील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here