5000एमएएच बॅटरी आणि 6.6 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, देईल का Xiaomi-Realme ला टक्कर

Infinix ने मागे एक नवीन स्मार्टफोन Infinix Hot 10 पाकिस्तान मार्केट मध्ये सादर केला होता. लो बजेट मध्ये आलेला हा फोन पावरफुल बॅटरी सोबतच लार्ज डिस्प्ले व मोठ्या कॅमेरा सपोर्ट सह आला होता. आता कंपनीने या फोनचा लाइट वेरिएंट म्हणजे Infinix Hot 10 Lite जागतिक बाजारात सादर केला आहे. Infinix Hot 10 Lite स्मार्टफोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे आणि हा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. तसेच स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो, जसा Infinix Hot 10 मध्ये मिळाला होता.

डिजाइन

इनफिनिक्स हॉट 10 लाइटची डिजाइन पाहता, हा फोन वॉटर-ड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. तसेच फोनच्या बॉटमला 3.5एमएम ऑडियो जॅक, स्पीकर ग्रिल आणि चार्जिंग पोर्टचा समावेश आहे. हँडसेटच्या मागे डावीकडे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, त्यात एलईडी फ्लॅश लाइट पण देण्यात आली आहे. तसेच मागे सिक्योरिटीसाठी वरच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन मध्ये 6.6-इंचाचा आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720×1,600 पिक्सल रेज्यूलेशनचा आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio A20 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 2GB रॅम सह येतो. स्मार्टफोन मध्ये 32 जीबी स्टोरेज मिळते, जी माइक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, त्याची मेन लेंस 13 मेगापिक्सल आहे. तसेच फोन मध्ये दोन QVGA सेंसर देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 5,000mAh च्या बॅटरी सह येतो, जिच्याबाबत कंपनीचा दावा आहे कि बॅटरी फुल चार्ज झाल्यावर 33 तासांचा टॉकटाइम देईल. स्मार्टफोन मध्ये मागे फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच स्मार्टफोन डुअल सिमला सपोर्ट सह येतो. Infinix Hot 10 Lite स्मार्टफोन अँड्रॉइड 10 (गो एडिशन) वर चालतो.

किंमत

कंपनीच्या लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन फक्त एक 2GB + 32GB स्टोरेज कॉन्फिग्रेशन मध्ये येतो. तसेच फोन चार कलर मध्ये उपलब्ध होईल. स्मार्टफोनच्या कलर ऑप्शनच्या नावांची माहिती देण्यात आली नाही. फोन NGN 45,400 (जवळपास 8700 रुपये) मध्ये नाइजीरियात तर घाना मध्ये याची किंमत GHS 599 (जवळपास 7,600 रुपये) आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here