इंफिनिक्स येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्या Hot 50 सीरीजचा प्रोडक्ट पोर्टफोलियोला पुढे वाढवू शकते. यात जवळपास पाच मॉडेल लाँच होऊ शकतात. हा Infinix Hot 50, Hot 50 5G, Hot 50 Pro, Hot 50 Pro+ आणि Hot 50i नावाने येऊ शकतो. सध्या यातील एक Infinix Hot 50 5G गुगल प्ले कंसोल, गीकबेंच आणि TUV सर्टिफिकेशनवर स्पॉट झाला आहे. चला, पुढे जाणून घेऊया आगामी फोन कोणत्या स्पेक्ससह येऊ शकतो.
Infinix Hot 50 5G लिस्टिंग
- गुगल प्ले कंसोल डेटाबेसनुसार Infinix Hot 50 5G दोन मॉडेल नंबर “X6720” आणि “X6720B” मध्ये स्पॉट झाला आहे. दोन्ही मॉडेल वेगवेगळ्या मार्केटसाठी असण्याची शक्यता आहे.
- लिस्टिंगमध्ये सांगण्यात आलं आहे की Infinix Hot 50 5G मध्ये MediaTek Dimensity 6100+ चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU मिळू शकतो.
- फोनच्या X6720 मॉडेलमध्ये 4GB रॅमचा संकेत मिळाला आहे तर X6720B व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम दिली जाऊ शकते.
- डिव्हाईसचा X6720 मॉडेल बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर पण दिसला आहे. यात MediaTek Dimensity 6300 SoC मिळण्याची चर्चा आहे.
- गुगल प्ले कंसोल डेटाबेसवर Infinix Hot 50 5G चे स्क्रीन रिजॉल्यूशन 720×1600 सांगण्यात आले आहे, तर पिक्सल डेंसिटी 320 DPI आहे.
- ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत फोन लेटेस्ट Android 14 वर काम करू शकतो.
- TUV Rheinland सर्टिफिकेशनमध्ये Hot 50 5G मध्ये 4,900mAh ची मोठी बॅटरी असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच Infinix Hot 50 सीरीजचे दुसरे मॉडेल आणि इतर माहितीसाठी काही दिवसानंतर माहिती समोर येऊ शकते.
Infinix Hot 40 चे स्पेसिफिकेशन
गेल्यावर्षी Infinix Hot 40 ग्लोबली सादर झाला होता. ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
- डिस्प्ले: Infinix Hot 40 मध्ये 6.78-इंचाचा LCD FHD+ डिस्प्ले आहे. यावर 90Hz रिफ्रेश रेट, 500 निट्स ब्राईटनेस आणि 1080×2460 पिक्सल रिजॉल्यूशन मिळते.
- प्रोसेसर: इनफिनिक्स हॉट 40 मीडियाटेक हेलियो जी 88 चिपसेटसह येतो.
- स्टोरेज: फोनमध्ये 4GB, 8GB LPDDR4 रॅम, 8GB व्हर्च्युअल रॅम आणि 128GB तथा 256GB इंटरनल स्टोरेज मिळते.
- कॅमेरा: Infinix Hot 40 मध्ये 32MP फ्रंट कॅमेरा ड्युअल-एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. तसेच, बॅक पॅनलवर क्वॉड फ्लॅश असलेला 50MP + 2MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.
- बॅटरी: Infinix Hot 40 मध्ये 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.














