Infinix HOT 50i लवकरच होऊ शकतो लाँच, टिझर पोस्टर, स्पेसिफिकेशन आले समोर

Infinix ने भारतीय बाजारात Hot50 स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचवेळी, आता त्याचे लो व्हर्जन Infinix HOT 50i ची वेळ आली आहे. असे सांगितले जात आहे की हा फोन पहिल्यांदाच जागतिक मार्केटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तो भारतात दाखल होण्याची देखील अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तुम्हाला सांगतो की लाँचपूर्वी डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन आणि टीझर पोस्टरची इमेज समोर आली आहे. ज्याचे तपशील तुम्ही पुढे पाहू शकता.

Infinix HOT 50i चे डिझाईन

माय स्मार्ट प्राईस द्वारे Infinix HOT 50i चे प्रमुख तपशील समोर आले आहेत. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर लीक झालेल्या पोस्टरमध्ये फोनला कर्व्ह स्क्वेअर शेप कॅमेरा मॉड्यूलसह पाहिले जाऊ शकते. ज्यामध्ये कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश दिसत आहेत. समोरच्या बाजू बद्दल बोलायचे झाले तर डिव्हाईस फ्लॅट डिस्प्ले आणि पंच होल नॉचसह दिसत आहे. नवीनतम लीकनुसार डिव्हाईस स्लीक ब्लॅक, टायटॅनियम ग्रे आणि सेज ग्रीन सारख्या तीन रंगांमध्ये येण्याची अपेक्षा आहे.

Infinix HOT 50i स्पेसिफिकेशन (अपेक्षित)

  • डिस्प्ले: लीकमध्ये असे सांगण्यात आले आहे की आगामी Infinix HOT 50i मध्ये 6.7 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्यावर पंच होल कटआऊट आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात येण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर फोनमध्ये डायनॅमिक बार आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले फिचर मिळणार असल्याचेही समोर आले आहे.
  • चिपसेट: मोबाईलमध्ये परफॉर्मन्सच्या बाबतीत कंपनी MediaTek Helio G81 चिपसेट स्थापित करू शकते. तुम्हाला सांगतो की हा 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला चिपसेट आहे. ज्यामुळे तुम्हाला स्मूथ अनुभव मिळेल.
  • स्टोरेज आणि रॅम: फोनच्या स्पीड आणि स्पेसच्या बाबतीत नवीन डिव्हाईस 4GB रॅम आणि 4GB व्हर्च्युअल रॅमसह येऊ शकते. याचा अर्थ वापरकर्त्यांना एकूण 8GB ची शक्ती मिळू शकते. यासोबतच 256 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर असे सांगण्यात आले आहे की Infinix HOT 50i स्मार्टफोन 48 मेगापिक्सेलच्या रिअर प्रायमरी कॅमेरा लेन्ससह लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कंपनी 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट कॅमेरा लेन्सचा वापर करू शकते.
  • बॅटरी आणि चार्जिंग: फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh च्या आकाराची बॅटरी मोबाईलमध्ये मिळू शकते. ती चार्ज करण्यासाठी 18 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असू शकतो.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर Infinix HOT 50i हा अँड्रॉईड 14 आधारित एक्सओएस वर रन करू शकतो.
  • इतर: मोबाईलमध्ये 48 महिन्यांचा फ्लूएन्ट परफॉर्मन्स, सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी 300% अल्ट्रा व्हॉल्यूमसह ड्युअल स्पीकर मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here