Exclusive : Infinix आणि TECNO ची पण आहे तयारी, Realme आणि Xiaomi ला टक्कर देण्यासाठी स्वस्त स्मार्ट टीव्ही

इंडियन टेक मार्केट मध्ये Infinix चे नाव त्या ब्रँडस मध्ये येते जे कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन्स घेऊन येतात. क्वॉड कॅमेरा, पंच-होल डिस्प्ले किंवा मोठी बॅटरी या सर्व सेग्मेंट्स मध्ये भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा टॅग Infinix कडे आहे. इनफिनिक्सच्या पॅरेण्ट कंपनीचा दुसरा ब्रँड TECNO पण या यादीत येतो. इनफिनिक्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फोन विकतो तर टेक्नोने ऑफलाईन मार्केट वर कब्जा केला आहे. या दोन्ही ब्रँडस संबंधित एक मोठी बातमी आज आम्हाला मिळाली आहे ज्यात खुलासा झाला आहे कि स्मार्टफोन नंतर आता हे दोन्ही ब्रँड भारतात आपला स्मार्ट टेलीविजन पण लॉन्च करणार आहेत.

91मोबाईल्सला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कि Infinix आणि TECNO हे दोन्ही ब्रँड भारतात स्मार्टटीव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार इनफिनिक्सची योजना जानेवारीत स्मार्ट टीव्हीची घोषणा केली होती, पण कोरोना वायरसच्या प्रभावामुळे त्यांना आपली योजना बदलावी लागली. सूत्रांनुसार इनफिनिक्स येत्या काही दिवसांत बाजाराची स्थिती सुधारल्यास आपले स्मार्ट टेलीविजन अधिकृतपणे सादर करेल. आपल्या टीव्हीने ब्रँड Realme आणि Xiaomi ला चांगली टक्कर देणार आहे.

Infinix च्या या एंडरॉयड स्मार्टटीव्ही बद्दल आम्हाला सांगण्यात आले आहे कि कंपनीचा हा नवीन प्रोडक्ट 43 इंचाच्या डिस्प्ले सह येईल आणि स्मार्टटीव्हीची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असेल. इनफिनिक्स एकापेक्षा जास्त मॉडेल बाजारात आणेल हि बाब नाकारता येत नाही. इनफिनिक्स नंतर TECNO पण आपल्या स्मार्ट टीव्ही सह तयार आहे. इनफिनिक्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपली स्मार्ट टीव्ही लॉन्च करेल तर टेक्नोची स्मार्टटीव्ही खासकरून ऑफलाईन मार्केटसाठी लॉन्च केली जाईल.

Realme Smart TV

Realme Smart TV BIS म्हणजे ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड वर लिस्ट केली गेली आहे आणि या लिस्टिंगची माहिती प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मा यांच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर या लिस्टिंगचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे ज्यावरून समजले आहे कि रियलमी टीव्ही बीआईएस वर JSC55LSQLED मॉडेल नंबर सह लिस्ट केली गेली आहे. या लिस्टिंग मध्ये टीव्हीच्या स्क्रीनची पण माहिती मिळाली आहे. इथे Realme TV 43 इंचाच्या पॅनल सह लिस्ट आहे. आशा आहे कि रियलमी टीव्हीचा बेस मॉडेल 43 इंचाचा असेल आणि कंपनी या साईज पेक्षा मोठे डिस्प्ले असलेले मॉडेल्स पण बाजारात आणेल.

रियलमीने आधीच सांगितले आहे कि कंपनी भारतात आपली स्मार्टटीव्ही पण लॉन्च करेल. Realme ब्रँडच्या पहिल्या स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि हि स्मार्ट टीव्ही यावर्षी दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. Realme TV बाबत माधव म्हणाले कि जगात पहिल्यांदा भारतातच लॉन्च होईल आणि भारतीय यूजर्सना केंद्रस्थानी ठेऊन रियलमी टीव्ही मध्ये खास कस्टमाइजेशन केले जात आहे. Realme Smart TV एप्रिल पासून जून दरम्यान भारतात लॉन्च होईल. आशा आहे कि Realme Smart TV फक्त कमी किंमतीत येणार नाही तर इंडियन यूजर्सच्या दृष्टीने टीव्ही मध्ये कंटेंट पण मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here