तुम्हाला माहित आहे का इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेयर करून तुम्ही पैसे पण कमवू शकता. जर तुम्ही देखील इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असाल तर तुमच्या पोस्ट आणि रील्सच्या माध्यमातून कमाई करता येईल. परंतु ह्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं अकाऊंट नॉर्मल अकाऊंटवरून प्रोफेशनल अकाऊंटमध्ये रूपांतरित करावं लागेल. ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला सर्वप्रथम नॉर्मल अकाऊंट प्रोफेशनल अकाऊंटमध्ये रूपांतरित करण्याची पद्धत सांगणार आहोत. त्यानंतर आम्ही या आर्टिकलमध्ये काही अशा पद्धती सांगितल्या आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही इन्स्टाग्रामवर कमाई करू शकता.
इन्स्टाग्राममध्ये प्रोफेशनल अकाऊंट कसं बनवायचं?
इन्स्टाग्रामवर जेव्हा आपण अकाऊंट बनतो तेव्हा ते साधं अकाऊंट असतं. इन्स्टाग्रामवरून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला तुमचं नॉर्मल अकाऊंट प्रोफेशनल अकाऊंटमध्ये रूपांतरित करावं लागेल. इन्स्टाग्रामवर प्रोफेशनल अकाऊंट देखील प्रकारचे असतात. ह्यात एक क्रिएटर अकाऊंट आणि दुसरं बिजनेस अकाऊंट असतं.
स्टेप 1 : सर्वप्रथम ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ मेन्यूवर क्लिक करा.
स्टेप 2 : इथे तुम्हाला अकाऊंट टाइप अँड टूल्सवर टॅप करा.
स्टेप 3 : एक नवीन पेज उघडेल, ज्यात स्विच टू प्रोफेशनल अकाऊंटवर टॅप करा. इथे काही सूचना दिसतील त्या फॉलो करून तुम्हाला पुढे जावं लागेल.
स्टेप 4 : इथे तुम्हाला क्रिएटर अकाऊंट आणि बिजनेस अकाऊंटचे दोन ऑप्शन मिळतील.
जर तुमचा बिजनेस असेल तर इन्स्टाग्रामवर बिजनेस अकाऊंट सिलेक्ट करा आणि जर तुम्ही सामान्य क्रिएटर असाल तर क्रिएटर अकाऊंटवर क्लिक करा. अशाप्रकारे तुम्ही तुमचं नॉर्मल अकाऊंट प्रोफेशनल अकाऊंटवर स्विच करू शकता.
इन्स्टाग्रामवरून अशाप्रकारे कमवा पैसे
इन्फ्लूअन्सर बनून
जर इन्स्टाग्रामवर तुमचे फॉलोवर जास्त असतील तर तुम्ही इन्फ्लूअन्सर बनून प्रोडक्ट प्रमोट करू शकता. परंतु ह्यासाठी तुमचे इन्स्टाग्रामवर फॉलोअलर्स जास्त असणं आवश्यक आहे, तरच मोठे ब्रँड तुमच्याशी कॉलॅब्रेशन करतील. तसेच फॉलोअर्स तुमचे ऐकणारे असावे आणि तुमच्या पोस्टवर चांगली एंगेजमेंट असावी. इन्स्टाग्रामवर इन्फ्लूअन्सर बनून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
अफिलीएट मार्केटिंग
अफिलीऐट मार्केटिंग आणि स्पॉन्सर पोस्ट एकसारखे बिजनेस मॉडेल आहेत. परंतु अफिलीऐट मार्केटिंगमध्ये तुम्हाला तेव्हाच पेमेंट मिळतं जेव्हा तुमच्या लिंकवरून एखादा युजर प्रोडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी करतो. तसेच स्पॉन्सर्स पोस्टसाठी तुम्हाला थेट पैसे मिळतात. अफिलीएट मार्केटिंग खूप चॅलेंजिंग आहे कारण तुमचे फॉलोअर्स असावे असे असावे लागत जे तुम्ही सांगितल्यावर एखादं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वापरतील. इन्स्टाग्राम युजर्सना फक्त बायोमध्ये क्लिकेबल लिंक टाकण्याची परवानगी देतो. त्यामुळे प्रोमो कोडच्या माध्यमातून तुम्ही इन्स्टाग्रामवरून पैसे कमवू शकता.
इन्स्टाग्राम शॉप
तुम्ही इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून ई-कॉमर्स स्टोर शॉप सेट करू शकता. अशाप्रकारे तुम्ही इन्स्टाग्रामवर पोस्ट, स्टोरी आणि रील टाकून प्रोडक्ट प्रमोट करू शकता. उदारहणार्थ, जर तुमचं कपड्यांचं दुकान असेल तर तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून तुमचे कपडे ऑनलाइन विकू शकता. जर तुमच्याकडे चांगल्या क्वॉलिटीचं सामान असेल तर तुम्ही इन्स्टाग्रामवर वेगानं वाढू शकता.
कॅप्शन रायटिंग
इन्स्टाग्रामवर पोस्टसाठी तुम्हाला कॅप्शन लागतं. तुम्ही इतर इन्स्टाग्राम युजर्ससाठी कॅप्शन रायटिंग करून पैसे कमवू शकता. काही ब्रँड आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या मार्केटिंगसाठी Instagram चा वापर करता, परंतु त्यांना आकर्षक कॅप्शन हवं असतं. तुम्ही कॅप्शन लिहून पैसे कमवू शकता.
इन्स्टाग्राम कन्सल्टंट
जर तुम्ही इन्स्टाग्रामवरील कसलेले खेळाडू असाल तर तुम्ही दुसऱ्या युजर्ससाठी कन्स्लटंट म्हणून वेगानं मदत करू शकता. अनेक युजर्स आपले इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवणे आणि इन्स्टाग्रामवरून पैसे कमावण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा युजर्सना तुम्ही इन्स्टाग्राम कन्सल्टंट म्हणून मदत करू शकता. अशाप्रकारे तुम्ही चांगली कमाई करू शकता.
डिजिटल आर्टवर्क तयार करू शकता
जर तुम्ही पोस्टर, फोटो, पेंटिंग, अॅनिमेशन आणि व्हिडीओ सारखे आर्टवर्क चांगल्यापद्धतीने बनवू शकत असता तर तुम्ही हे डिजिटल आर्टवर्कच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर पैसे कमवू शकता. इन्स्टाग्रामवर अनेक ब्रँड, कंपन्यांना आणि युजर्सना डिजिटल आर्टवर्कची आवश्यकता असते. तुम्ही तुमचं सॅंपल आर्टवर्क शेयर करून फ्रीलांस काम करू शकता. इन्स्टाग्रामवर आर्टवर्क बनवून तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरून चांगली कमाई करू शकता.
