ई-कॉमर्स वेबसईट iPhone प्रेमींसाठी घेऊन येत आहे ‘चांगली संधी’. तसेच 27 सप्टेंबर 2024 पासून Flipkart वर Big Billion Days Sale सुरु झाले आहे. जे 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालेल. येथे तुम्हाला Apple चे प्रीमियम स्मार्टफोन iPhone 15 pro max वर 24,900 रुपयां पर्यंतचा डिस्काऊंट मिळेल. यामुळे जर तुम्ही पण अॅप्पल डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत आहात तर, चला जाणून घेऊया या सेलचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता.
iPhone 15 Pro Max वर डिस्काऊंट
- तुम्ही ऑफरसह iPhone 15 Pro Max ला 1,09,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीत विकत घेता येईल.
- स्मार्टफोनवर सामान्य डिस्काऊंट व्यतिरिक्त बँक कार्ड आणि EMI ट्रांजॅक्शंस सारखे डिस्काऊंट दिले जातील.
- जर तुम्ही एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट EMI चा पर्याय घेऊ शकता, तर पण तुम्हाला सूट मिळेल.
- iPhone 15 Pro Max ची ऑफर किंमत 119,999 रुपये ठेवली जाईळ. ज्यावर ग्राहकांना 5,000 रुपयांचा बँक डिस्काऊंट आणि 5,000 रुपयांचा एडिशनल एक्सचेंज डिस्काऊंट मिळेल.
- फ्लिपकार्ट विआयपी कस्टमर्सला 2,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जाईल. ज्यानंतर फोनची किंमत मात्र 1,07,999 रुपये होईल.
- तसेच iPhone 15 Pro Max ची ओरिजनल किंमत सध्या 1,34,900 रुपये आहे.
काय तुम्हाला iPhone 15 Pro Max खरेदी करायचा आहे?
भारतात अॅप्पलची iPhone 16 सीरीजच्या लाँचनंतर iPhone 15 सीरीजची किंमत कमी झाली आहे. जर गोष्ट लेटेस्ट iPhone 16 Pro Max ची असेल तर याचा बेस मॉडेल 256 जीबी 1,44,900 रुपयांना आहे. यात अनेक अपग्रेड जरूर आहेत मात्र iPhone 15 Pro Max मागच्या पीढीचा सर्वात मोठा मॉडेल होता यामुळे कमी किंमतीमध्ये घेणे चांगला पर्याय आहे. या प्रीमियम फोनचे फुल स्पेक्स तुम्ही पुढे पाहू शकता.
iPhone 15 Pro Max चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: iPhone 15 Pro Max मध्ये 2796×1290 पिक्सल असलेला HDR, ट्रू टोन, डायनॅमिक आईलँड, ऑलवेज-ऑन डिस्प्ले आहे. हा 120 हर्ट्स प्रोमोशन टेक्नॉलॉजी आणि सिरॅमिक शील्ड सुरक्षेसह 6.7-इंचाच्या ओएलईडी सुपर रेटिना एक्सडीआर स्क्रीनसह येतो.
- प्रोसेसर: Apple ने डिव्हाईसमध्ये A17 प्रो चिप, 6 कोर प्रोसेसर दिला आहे.
स्टोरेज: फोनला 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज सारखे तीन पर्यायाामध्ये आणले जाऊ शकते. - कॅमेरा: iPhone 15 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात f/1.78 अपर्चरसह 48MP चा मेन कॅमेरा, f/2.28 अपर्चर असलेला 12MP अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि तिसरा 12MP टेलीफोटो सेन्सर मिळतो. यात 5x ऑप्टिकल झूम मिळतो. तसेच सेल्फी घेण्यासाठी 12MP चा ट्रू डेप्थ फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: फोनमध्ये फास्ट चार्जिंगसह 15W MagSafe वायरलेस चार्जिंगला सपोर्ट आहे.
- इतर फिचर्स: कनेक्टिव्हिटीसाठी 5 जी, गीगाबिट-क्लास एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, एनएफसी, जीपीएस सारखे फिचर्स आहेत. तसेच, यात IP68 पाणी आणि धूळीपासून वाचणारी रेटिंग, स्टीरिओ स्पिकर आणि फेसआयडी सेन्सर पण मिळतो.
- ओएस: iPhone 15 Pro Max कंपनीच्या आयओएस 17 बॉक्स ऑपरेटिंग सिस्टम सह आला होता. जो आता अपग्रेड झाला आहे.