नवीन आयफोन येत आहेत. Apple 9 सप्टेंबर रोजी आपली नवीन iPhone 16 सीरीज सादर करणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कंपनी यावेळी आयफोन 16 मॉडेलचे 90 दशलक्ष पेक्षा अधिक युनिट्स शिप करण्याची योजना आखत आहे. ब्रँडचा विश्वास आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत आयफोन 16 च्या विक्रीत 10 टक्क्यांची वाढ होईल. पण यावेळी Apple iPhone 16 मध्ये असे काय खास असेल की तो यशाचे जुने रेकॉर्ड देखील मोडू शकेल? आगामी आयफोन 16 सीरीजशी संबंधित लीक झालेले तपशील तुम्ही पुढे वाचू शकता.
आयफोन 16 सीरीज लाँच तारीख
iPhone 16 सीरीज 9 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. या तारखेला नवीन Apple iPhones संपूर्ण जगासह भारतीय बाजारपेठेत ही लाँच केले जातील. कंपनी या तारखेला रात्री 10:30 वाजता ॲपल इव्हेंट सुरू करेल. त्याला ॲपलच्या अधिकृत वेबसाईटसह ब्रँडच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लाईव्ह पाहता येईल.
आयफोन 16 सीरीजमध्ये कोणते फोन लाँच होतील?
याची पुष्टी झालेली नाही पण चर्चा आहे की यावेळी आयफोन 16 सीरीजमध्ये एकूण 5 मॉडेल्स आणले जाऊ शकतात. यामध्ये व्हॅनिला मॉडेल सोबतच प्लस, प्रो आणि प्रो मॅक्स यांचा समावेश असेल.
- iPhone 16
- iPhone 16 Plus
- iPhone 16 Pro
- iPhone 16 Pro Max
- iPhone 16 Plus SE/iPhone SE (2024)
आयफोन 16 सीरीजचा दर किती असेल?
iPhones त्यांच्या महागड्या किमतीसाठीही प्रसिद्ध आहेत. बाजारात उपलब्ध असलेला iPhone 15 Pro Max 1TB हा 1,99,900 रुपयांना विकला जात आहे. अशा परिस्थितीत यावेळी देखील iPhone 16 सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत 2 लाख रुपयांच्या जवळपास पोहोचू शकते. त्या चर्चा आहे की iPhone 16 Pro देखील 1TB मेमरीसह लाँच केला जाऊ शकतो.
आयफोन 15 हा 79,900 रुपयांना लाँच झाला होता, आयफोन 14 ची लाँच किंमत देखील 79,900 रुपये होती आणि आयफोन 13 देखील 79,900 रुपयांमध्ये आणला गेला होता! म्हणजे गेले तीन जनरेशन एकाच किमतीत लाँच झाले होते. अशा परिस्थितीत आयफोन 16 हा 79,900 रुपयांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
मेड इन इंडिया आयफोन
मीडिया रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, यावेळी ॲपल कंपनी आपल्या नवीन आयफोन सीरीजचे ‘प्रो’ मॉडेल्स भारतात बनवू शकते. यामध्ये iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यांचा समावेश असेल. रिपोर्टनुसार, त्यांना तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदूर येथील फॉक्सकॉन प्लांटमध्ये तयार केले जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ॲपल आपल्या मोबाईल फोनचे मोठे मॉडेल्स भारतात तयार करण्याची ही पहिलीच वेळ असेल आणि त्याचा परिणाम फोनच्या किमतीवर ही दिसून येऊ शकतो.
ॲपल इंटेलिजन्स
आयफोन 16 सीरीज एआय फिचर्स ने सुसज्ज असेल. जिथे एआय चा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसून ॲपल इंटेलिजन्स असा आहे. काम तेच, फरक फक्त नावाचा आहे. नवीन ॲपल आयफोन एआय तंत्रज्ञानासह येतील जे त्यांना खूप प्रगत आणि विशेष बनवेल. या संदर्भात संपूर्ण तपशील समोर आलेला नाही पण अपेक्षा करू शकतो की हा एआय फोनची फोटोग्राफी, एडिटिंग, यूजर इंटरफेस आणि सॉफ्टवेअर संबंधित कामांमध्ये दिसेल.
आयओएस 18
कंपनीने आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 18 ची घोषणा केली आहे आणि तिच आपल्याला आगामी आयफोन्स मध्ये पहायला मिळणार आहे. हे तेच फिचर आहे ज्याबद्दल ॲपलला इतका आत्मविश्वास आहे की, त्यांना वाटते आयफोन 16 सीरीज 90 दशलक्षाहून अधिक डिव्हाईस विकेल. आयओएस 18 मध्ये ॲडव्हान्स युजर इंटरफेस, उपयुक्त शॉर्टकट्स, ग्राफिक्स आणि विजेट्स सोबत उत्तम डेटा सुरक्षा आणि गोपनीयता मिळेल.
आयफोन 16 सीरीजची डिझाईन कशी असेल?
- अशी चर्चा सुरू आहे की आयफोन 16 सीरीजसह कंपनी आपल्या सध्याच्या कॅमेऱ्याची स्टाईल बदलू शकते आणि यामध्ये व्हर्टीकल शेप असलेला रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. असे डिझाईन आपल्याला iPhone X पहायला मिळाले होते.
- लीकवर विश्वास ठेवायचा झाल्यास या आयफोन सीरीजमध्ये फिजिकल बटणे काढून टाकली जाऊ शकतात आणि व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटणाच्या जागी टच सेन्सिटिव्ह सेन्सर दिले जाऊ शकतात.
- आणखी एक मोठा बदल आपल्याला ‘कॅप्चर बटण’ चा पहायला मिळू शकतो. हे बटण तळाशी उजव्या बाजूला दिले जाऊ शकते जे कॅमेरा शॉर्टकट म्हणून काम करेल आणि कॅप्चर करण्यासोबत झूम, फोकस इत्यादी गोष्टी देखील ते करेल.
- नवीन लीकनुसार आयफोन 16 प्रो डेझर्ट यलो (डेझर्ट टायटॅनियम) आणि सिमेंट ग्रे (टायटॅनियम ग्रे) रंगांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
आयफोन 16 सीरीजमध्ये काय मिळेल?
आयफोन स्क्रीन
आयफोन 16 मध्ये देखील डायनॅमिक आयलंड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. असे मानले जात आहे की यावेळी प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल आयफोन 15 पेक्षा मोठे असतील. iPhone 16 Pro मध्ये 6.27 इंचाची स्क्रीन आणि iPhone 16 Pro Max मध्ये 6.86 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तर iPhone 16 हा 6.1 इंचाच्या XDR डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो.
आयफोन कॅमेरा
Apple iPhone 16 Pro Max मध्ये 48 मेगापिक्सेलचा Sony IMX903 सेंसर दिला जाऊ शकतो जी एक टेलीफोटो पेरिस्कोप लेन्स असेल. या मॉडेलमध्ये 48 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरा सेन्सर पहायला मिळू शकतात. त्याचवेळी iPhone 16 Pro मध्ये 48 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स दिली जाणार असल्याचे लीकमधून समोर आले आहे. जो ProRAW फोटो कॅप्चर करेल आणि कमी प्रकाशातील फोटोग्राफीमध्ये तज्ञ असेल. या दोन्ही मॉडेल्समध्ये 5x ऑप्टिकल झूम ते 25x डिजिटल झूम पहायला मिळू शकते.
त्याचवेळी सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास आयफोन 16 सीरीजमधील सर्व मॉडेल्समध्ये 12 मेगापिक्सेलचा TrueDepth फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो जो सध्याच्या आयफोन्स पेक्षा चांगला आणि अपग्रेड असेल.
आयफोन रॅम आणि स्टोरेज
रॅमच्या बाबतीत देखील आयफोन 16 सीरीजमध्ये एक मोठे अपग्रेड पाहिले जाऊ शकते. नवीन आयफोन 16 हा 8GB रॅम वर लाँच केला जाऊ शकतो. हेच आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेलमध्ये देखील पाहिले जाऊ शकते. स्टोरेजच्या बाबतीत कदाचित आयफोन 16 सीरीजमध्ये जास्त बदल केले जाणार नाहीत. आयफोन 16 सीरीजचे 128GB स्टोरेज हे बेस मॉडेल असू शकते. तर सर्वात मोठे मॉडेल iPhone 16 Pro Max हे 1TB स्टोरेजसह बाजारात येऊ शकते. आता कोणत्या मॉडेलमध्ये किती स्टोरेज पर्याय दिले जातील हे पाहणे बाकी आहे.
आयफोन प्रोसेसर
ऍपल आयफोनला इतर मोबाईलपेक्षा वेगळे बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची प्रोसेसिंग आहे. अँड्रॉइड वापरकर्ते देखील प्रशंसा करतात की कशी कमी रॅम असूनही आयफोन प्रोसेसिंग मध्ये अतिशय जलद आहेत आणि हँग किंवा लॅग देखील होत नाहीत. लीक्समधून समोर आले आहे की iPhone 16 A17 Pro चिप सह येऊ शकतो. तर iPhone 16 Pro Max मध्ये Bionic A18 चिप पहायला मिळू शकते. लक्षात घेण्यासारखे आहे की ही मोबाईल चिप मल्टी-कोअर सीपीयू आणि जीपीयू सोबत न्यूरल इंजिनने सुसज्ज असेल.