iQOO ब्रँड भारतात इतका लोकप्रिय झाला नाही त्यामुळे कंपनी दमदार स्पेसिफिकेशन्स आसलेले स्मार्टफोन लागोपाठ सादर करत आहे. कंपनी भारतात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 9T लाँच करण्याची योजना बनवत आहे. आयकूचा हा स्मार्टफोन भारतात 2 ऑगस्टला लाँच केला जाईल, अशी माहिती आता समोर आली आहे. तसेच iQOO 9T स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल प्रोसेसर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळेल, जो शाओमीच्या Xiaomi 12S Ultra आणि आगामी OnePlus 10T मध्ये मिळणार आहे. आयकूचा हा फोन क्वॉलकॉमच्या नव्या फ्लॅगशिप प्रोसेसरसह येणारा भारतातील सर्वात पहिला स्मार्टफोन ठरू शकतो. iQOO 9T स्मार्टफोन चीनमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या iQOO 10 चा रिब्रँड व्हर्जन असेल, अशी चर्चा आहे. हा आगामी स्मार्टफोन अॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे तिथून या फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे.
iQOO 9T कधी होईल लाँच
iQOO 9T स्मार्टफोन भारतात 2 ऑगस्टला लाँच होणार आहे. याआधी समोर आलेल्या लीक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, आयकूचा हा फोन भारतात 28 जुलैला लाँच होईल आणि या फोनची विक्री 2 ऑगस्टपासून सुरु होईल. हा फोन ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. फोनचा व्हाईट कलर मॉडेल BMW Legend Edition असू शकतो ज्याला Alpha किंवा Legend नाव दिलं जाऊ शकतं. हे देखील वाचा: बजेट फ्रेंडीली गेमिंग फोन! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह Vivo T1x स्मार्टफोन लाँच
iQOO 9T चे स्पेसिफिकेशन्स
iQOO 9T स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या iQOO 10 चा रिब्रँड व्हर्जन आहे, त्यामुळे या हँडसेटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे. आगामी आयकू 9T फोनमध्ये 6.78-इंचाचा Full-HD+ AMOLED डिस्प्ले पॅनल दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen 1 SoC दिला जाईल. हा फोन 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB स्टोरेजसह सादर केला जाईल. हा फोन Android 12 OS वर आधारित कस्टम युआयवर चालेल.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50MP (GN5) सेन्सर OIS सपोर्टसह मुख्य कॅमेऱ्याचे काम करेल. जोडीला फोनमध्ये 13MP चा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 12MP ची टेलीफोटो लेन्स मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. iQOO 9T स्मार्टफोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 120W फास्ट चार्जला सपोर्ट करू शकते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. यात कनेक्टिव्हिटीसाठी LTE, Bluetooth 5.3, आणि ड्युअल बँड Wi-Fi मिळेल. हे देखील वाचा: 32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Vivo V25 Pro येणार भारतात; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
iQOO 9T ची संभाव्य भारतीय किंमत
iQOO 10 स्मार्टफोन चीनमध्ये 3699 युआनच्या बेस किंमतीत सादर करण्यात आला आहे. ही किंमत सुमारे 43,800 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे भारतात iQOO 9T स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत 50,000 रुपये पर्यंत ठेवली जाऊ शकते. या बजेटमध्ये कंपनीला विवो, वनप्लस, सॅमसंग आणि शाओमीच्या दणकट स्मार्टफोन्सचा सामना करावा लागेल.
