32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Vivo V25 Pro येणार भारतात; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

टॅक्स चोरीच्या आरोप असलेली चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo नं आपल्या मोबाईल बिजनेसकडे दुर्लक्ष केलेलं नाही. स्मार्टफोन मार्केटबद्दल बोलायचे झाले तर ही कंपनी भारतात आपली नवीन Vivo V25 series लाँच करण्याची तयारी करत आहे. या सीरीजमध्ये Vivo V25 आणि Vivo V25 Pro लाँच होतील, ज्यातील विवो वी25 प्रो आता BIS वर देखील लिस्ट झाला आहे. या स्मार्टफोन्सच्या लाँच डेटची अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही. परंतु ऑगस्टमध्ये Vivo V25 series सादर केली जाईल अशी चर्चा आहे. सीरीजचा प्रो मॉडेल आता बीआयएस म्हणजे Bureau of Indian Standards certification वर स्पॉट झाला आहे त्यामुळे लवकरच विवो वी25 प्रो स्मार्टफोनसह विवो वी25 देखील भारतात लाँच होऊ शकतो.

Vivo V25 series चा भारतीय लाँच

विवो इंडियानं आतापर्यंत आपल्या नव्या स्मार्टफोन सीरीजच्या लाँचबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी सीरीजचे दोन्ही मॉडेल्स एकत्र लाँच करणार नाही. Vivo V25 स्मार्टफोन आधी म्हणजे ऑगस्टमध्ये लाँच होईल. तर Vivo V25 Pro साठी थोडा वेळ जास्त म्हणजे सप्टेंबर महिन्याची वाट बघावी लागू शकते. हे देखील वाचा: आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली OnePlus ची लाँच डेट समजली; जाणून घ्या OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स

Vivo V25 Pro

स्पेसिफिकेशन्स पाहता, या फोनमध्ये 6.56-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी हा फोन MediaTek Dimensity 8100 सह सादर केला जाईल. Vivo V25 Pro स्मार्टफोनचे भारतात 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB असे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 50MP Sony IMX766V प्रायमरी लेन्स सह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा पोर्टरेट लेन्स असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo V25 Pro मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. पावर बॅकअपसाठी या विवो मोबाईलमध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळेल जी 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. विवो वी25 प्रो मोबाईल फोन 40,000 रुपयांमध्ये लाँच होईल, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार?

Vivo V25

विवो वी25 स्मार्टफोन 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवर चालणार 6.62-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिली जाऊ शकते. तसेच प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 778G SoC किंवा MediaTek Dimensity 1200 SoC मिळू शकतो. हा विवो मोबाईल 44W किंवा 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह फोनमध्ये 16MP चा Selfie कॅमेरा दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here