iQOO Neo 7 Pro ची इंडिया लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा माहिती

Highlights

  • फोन 20 जूनच्या आसपास सादर होऊ शकतो.
  • ह्यात Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट असू शकतो.
  • फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम दिली जाऊ शकतो.

iQOO भारतात आपला नवीन मोबाइल फोन घेऊन येत आहे जो काही दिवसांपूर्वी ब्रँडचे इंडिया हेड निपुण मार्या यांनी टीज देखील केला होता. परंतु अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही की कंपनी कोणता स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे, ताज्या ताजा लीकमध्ये नवीन आयकू फोनच्या नाव, लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. त्यानुसार iQOO Neo 7 Pro भारतात लाँच होऊ शकतो.

iQOO Neo 7 Pro इंडिया लाँच डेट (लीक)

आयकू नियो 7 प्रो संबंधित माहिती टिपस्टर अभिषेक यादवनं शेयर केली आहे. अजूनतरी कोणतंही ठराविक लाँच डेट तर सांगण्यात आली नाही परंतु लीकनुसार Neo 7 Pro 20 जूनच्या जवळपास भारतात लाँच होऊ शकतो. हा आयकू फोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच झालेल्या iQOO Neo 8 चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

iQOO Neo 7 Pro स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : iQOO Neo 7 Pro मध्ये 6.78 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 1260 x 2800 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो, 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस दिली जाईल.
  • प्रोसेसर : नवीन iQOO डिवाइसमध्ये युजर्सना स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 प्रोसेसर मिळू शकतो.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : iQOO Neo 7 Pro मध्ये मोठी 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात OIS सह 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा लेन्स मिळू शकते. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालेल.
  • सुरक्षा : डिवाइसमध्ये सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here