iQOO ने आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये एंट्री-लेवल iQOO U1X स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ऑफिशियल होण्याआधी iQOO U1X चायनीज ई-कॉमर्स वेबसाइट jd.com वर स्पॉट केला गेला होता, त्यामुले फोनची काही माहिती समोर आली होती. तसेच आता कंपनीने हा फोन सादर केल्यामुळे सर्व अंदाजांना पूर्णविराम लागला आहे. हा डिवाइस कंपनीच्या iQOO U1 चा डाउनग्रेड वर्जन आहे.
किंमत
iQOO U1X चीन मध्ये तीन मेमरी वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइसच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 899 (जवळपास रुपये), 6GB रॅम आणि 64GB की इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 999 (जवळपास रुपये) आणि 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 1,199 (जवळपास रुपये) आहे. तर फोन स्लिवर आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो.
स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता iQOO U1X मध्ये 6.51-इंचाचा HD+ IPS LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन (1,600 x 720 पिक्सल), पिक्सल डेंसिटी 269ppi आणि स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 89% आहे. तसेच डिवाइस वॉटर ड्रॉप नॉच सह येतो. डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 SoC आणि 6GB पर्यंतच्या रॅम सह 128GB पर्यंतची स्टोरेज आहे.
फोन अँड्रॉइड 10 बेस्ड iQOO U1x कस्टम स्किन वर चालतो. तसेच फोन मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे सिक्योरिटीसाठी देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 13MP प्राइमरी सेंसर, 2MP सेकंडरी लेंस आणि 2MP थर्ड सेंसर आहे. तसेच फोन मध्ये 8MP स्नॅपर फ्रंटला देण्यात आला आहे जो सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगचे काम करेल. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : iQOO Z1 5G स्मार्टफोन 144Hz डिस्प्ले आणि 8 जीबी रॅम सह झाला लॉन्च, करेल का Xiaomi ची सुट्टी
कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोन मध्ये 4G एलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आला आहे. तसेच फोनचे मेजरमेंट 164.41mm × 76.32mm × 8.41mm आणि वजन 192.3 ग्राम आहे.















