iQOO Z6 Lite 5G Sale: आयकूनं भारतीय बाजारात एक शानदार स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी सादर केला होता. कंपनीनं Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरसह जगातील पहिला फोन iQOO Z6 Lite 5G भारतात लाँच केला आहे. कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री आजपासून अॅमेझॉन इंडियावर केली जाईल. जर तुम्ही कमी किंमतीत Cheapest 5G Phone विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज होणाऱ्या सेलमध्ये iQOO Z6 Lite 5G तुम्ही मोठ्या डिस्काउंटसह विकत घेऊ शकता.
फक्त Snapdragon 4 Gen 1 नव्हे तर iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 120Hz FHD+ डिस्प्ले सारखे शानदार फीचर्स देखील आहेत. iQOO Z6 Lite 5G फोन आज म्हणजे 14 सप्टेंबरला पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होणार आहे. चला जाणून घेऊया या हँडसेटची किंमत, त्यावर मिळणारा डिस्काउंट, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स. हे देखील वाचा: वॉरंटीमध्ये नसलेले डिवाइस देखील मोफत रिपेयर करणार Redmi? कंपनीनं केली मोठी घोषणा
iQOO Z6 Lite 5G ची किंमत आणि ऑफर्स
iQOO Z6 Lite 5G चे दोन मॉडेल भारतीयांच्या भेटीला आले आहेत. या डिवाइसच्या 4GB रॅम व 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची प्राइस 13,999 रुपये (इफेक्टिव किंमत 11,499 रुपये) आहे. तर 6GB रॅम व 128GB स्टोरेज असेलला व्हेरिएंट 15,499 रुपयांमध्ये (इफेक्टिव किंमत 12,999 रुपये) विकत घेता येईल. पहिल्या सेलमध्ये हा फोन SBI कार्डनं विकत घेतल्यास 2,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देखील मिळेल. हा स्टेलर ग्रीन आणि मिस्टिक नाइट असा दोन स्टायलिश कलर्सयामध्ये विकत घेता येईल.
The all-new #iQOOZ6Lite5G is powered by the World's 1st Snapdragon 4 Gen 1 Mobile Platform and Best in Segment 120Hz Screen Refresh Rate*, starting at ₹11.499*. The sale begins on @amazonIN and https://t.co/UHWenFrz4q on Sep 14th | 12.15 PM.
Know More: https://t.co/KF57qZmHs3 pic.twitter.com/biJKQsK9pw
— iQOO India (@IqooInd) September 12, 2022
iQOO Z6 Lite 5G Specification
QOO Z6 Lite मध्ये 6.58-Fv FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात वॉटरड्रॉप नॉच डिजाइन दिसते. हा 2408×1080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर पाहता फोनमध्ये जगातील पहिला स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर मिळतो. जो 6nm प्रोसेसवर बनवण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते. तसेच हा फोन एक्सटेंडेड रॅम 2.0 टेक्नॉलॉजीसह येतो.
हा फोन दमदार गेमिंग परफॉर्मन्स देईल असा दावा कंपनीनं केला आहे. पावर बॅकअपसाठी डिवाइसमध्ये 18W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी मिळते. फोन रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये बेहतर परफॉरमेंस आणि हीटिंगपासून वाचण्यासाठी 4-कंपोनेंट असलेली कूलिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.
iQOO Z6 Lite मध्ये कंपनीनं ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 50MP ची आय ऑटोफोकस प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: दमदार बॅटरी आणि वेगवान चार्जिंग परवडणाऱ्या किंमतीत; itel च्या आगामी स्मार्टफोनची डिजाइन लीक
