दमदार बॅटरी आणि वेगवान चार्जिंग परवडणाऱ्या किंमतीत; itel च्या आगामी स्मार्टफोनची डिजाइन लीक

itel ब्रँड आपल्या लो बजेट एंट्री लेव्हल स्मार्टफोन्ससाठी लोकप्रिय आहे, कंपनी स्वस्त फोन्समध्ये देखील जबरदस्त स्पेसिफिकेशन्स देत असते. सध्या itel भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. 91mobiles ला इंडस्ट्रीमधील सूत्रांकडून आगामी स्मार्टफोन बाबत एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. तसेच आमच्याकडे आयटेलच्या आगामी स्मार्टफोनच्या रेंडर इमेज देखील आहेत, ज्यामुळे या फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे.

हा स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्ससह 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीनं हा स्मार्टफोन टीज करून सांगितलं आहे की हा फोन पूर्वीच्या Vision सीरीजच्या तुलनेत दुप्पट वेगवान आणि दुप्पट परफॉर्मन्स देईल. तसेच itel Vision सीरीजमधील आगामी स्मार्टफोन 8,000 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. रेंडर इमेजनुसार फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच या फोनच्या रियर पॅनलवर पॅटर्न डिजाइन दिली जाईल. आयटेलच्या या फोनमध्ये 5000mAh ची Li–Polymer बॅटरी दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: सेल्फ ड्राइव्हिंग टेक्नॉलॉजीसह येतेय Xiaomi ची इलेक्ट्रिक कार; मिळणार थक्क करणारे फीचर्स

itel च्या आगामी फोनची डिजाइन

आगामी itel Vision स्मार्टफोनची डिजाइन याच्या रेंडरच्या माध्यमातून लाँचच्या आधीच समोर आली आहे. त्यानुसार, या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात येईल. तसेच तळाला थोडा चिन पार्ट दिसेल. या फोनच्या उजवीकडे वॉल्यूम बटन आणि पावर बटन देण्यात आले आहेत.

Upcoming itel smartphone to launch with 5000mAh battery and 18W fast charging

बॅक पॅनलवर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात दोन कॅमेरा सेन्सर आणि एक LED फ्लॅश आहे. या फोनच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये AI Super Camera असं लिहिण्यात आलं आहे. या फोनमध्ये बॅक पॅनलवर सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. या फोनचा रेंडर ब्लू कलरमध्ये समोर आला आहे परंतु कंपनी आणखी कलर ऑप्शन देखील लाँच करेल. हे देखील वाचा: 5000mAh Battery असलेला Realme चा स्वस्त स्मार्टफोन लाँच; पहिल्याच सेलमध्ये ऑफर्सचा वर्षाव

5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग

itel च्या आगामी स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 18W का फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल, पावर बॅकअपसाठी यात 5000mAh बॅटरी मिळेल. या स्मार्टफोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स अजूनतरी समोर आले नाहीत. परंतु स्मार्टफोनच्या टीजर पोस्टरवरून समजले आहे की, फोनमध्ये 3GB रॅम आणि 3GB एक्सपांडेबल रॅम सपोर्ट मिळेल, म्हणजे एकूण 6GB रॅमची ताकद हा फोन देऊ शकेल. itel भारतात एंट्री लेव्हल स्मार्टफोन सेगमेंटमध्ये स्थिती मजबूत आहे. कंपनीचा दावा आहे की गेल्या दोन तिमाहीत 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here