स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह iQOO Z7s 5G ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत

Highlights

  • iQOO Z7s 5G ची किंमत 19 हजारांच्या आत ठेवण्यात आली आहे.
  • फोनमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 8जीबी पर्यंत रॅम मिळतो.

iQOO नं कोणताही गाजावाजा न करता गुपचूप iQOO Z7s 5G स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. हा कंपनीच्या Z7 सीरिजमधील दुसरा फोन आहे. ह्याआधी कंपनीनं डिमेन्सिटी 920 चिपसेटसह iQOO Z7 5G स्मार्टफोन यंदा मार्चमध्ये सादर केला होता. नवीन आयकू झेड7एस मिडरेंजमध्ये सादर करण्यात आला असून ह्याच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

आयकू झेड7एस ची किंमत

  • iQOO Z7s 5G 6GB + 128GB = 18,999 रुपये
  • iQOO Z7s 5G 8GB + 128GB = 19,999 रुपये

iQOO Z7s 5G मोबाइल फोन आता कंपनीच्या भारतीय वेबसाइटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे. फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेजसाठी 19,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन नॉर्वे ब्लू आणि पॅसिफिक नाईट कलर्समध्ये सादर करण्यात आला आहे.

आयकू झेड7एस चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.38” FHD+ AMOLED display
  • 90Hz refresh rate

iQOO Z7s 5G मध्ये 6.38 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1080 x 2400 पिक्सलसह फुल एचडी+ रिजोल्यूशन, 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 360 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 1300 निट्झ पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. तसेच सिक्योरिटीसाठी ह्यात फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

  • Snapdragon 695 chipset
  • 8GB RAM, 128GB storage

स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटची ताकद आयकू झेड7एस मध्ये देण्यात आली आहे. चांगल्या गेमिंग एक्सपीरियन्ससाठी कंपनीनं ह्यात मोशन कंट्रोल, 1200हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि अल्ट्रा गेमिंग मोड दिला आहे. हा डिवाइस 8जीबी पर्यंतच्या रॅम, 8जीबी वर्चुअल रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

  • 16 MP front camera
  • 64 MP primary camera with OIS

स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह ओआयएस सपोर्ट असलेला 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि जोडीला 2 मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा देण्यात आला आहे.

  • Android 13 OS
  • 44W fast charging

iQOO Z7s 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर चालतो. ह्यात 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 44 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ड्युअल सिम सपोर्ट, 5जी, वायफाय 5, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी सी पोर्ट आणि 3.5एमएम ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here