iQOO Z9 Pro 5G आणि Vivo T3 Pro 5G लवकरच होऊ शकतात लाँच, त्यांचा तपशील आला समोर

Vivo T3 Lite स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. तर iQOO त्यांचा Z9 Lite 5G हा 15 जुलै रोजी सादर करत आहे. या दोन्ही मोबाईल्स सोबतच हा ब्रँड प्रो व्हेरियंटवरही काम करत आहे. जे iQOO Z9 Pro 5G आणि Vivo T3 Pro 5G या नावांनी एन्ट्री घेऊ शकतात. ताज्या लीकमध्ये त्याच्या स्टोरेज आणि कलर पर्यायांचे तपशील देखील समोर आले आहेत. चला, पुढे या मोबाईलविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

iQOO Z9 Pro 5G आणि Vivo T3 Pro 5G चा तपशील

  • iQOO Z9 Pro 5G आणि Vivo T3 Pro 5G बद्दलची ही लीक माहिती पासोनेटगीकज च्या माध्यमातून समोर आली आहे.
  • यात असे म्हटले गेले आहे की, iQOO आणि Vivo दोन्ही ब्रँड त्यांच्या T3 आणि Z9 सीरीजचे प्रो मॉडेल आणू शकतात.
  • सर्वप्रथम Vivo T3 Pro 5G (मॉडेल क्रमांक V2404) लाँच होण्याची अपेक्षा आहे. याला केशरी आणि हिरव्या रंगात आणले जाऊ शकते. हा 8GB रॅम सह 128GB आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजमध्ये येईल असे म्हटले जात आहे.
  • iQOO Z9 Pro 5G बद्दल बोलायचे तर, तो (मॉडेल क्रमांक I2305) पांढऱ्या आणि नारंगी या दोन रांगांसह 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये एन्ट्री घेऊ शकतो.
  • iQOO आणि Vivo ने या डिव्हाईसची पुष्टी केलेली नाही. परंतु, जर लीकवर विश्वास ठेवायचा असेल तर ते ऑगस्टच्या सुरुवातीला लाँच केले जाऊ शकतात.

Vivo T3 5G चे स्पेसिफिकेशन

Vivo ने मार्च महिन्यात T3 सीरीजचे सामान्य मॉडेल Vivo T3 5G भारतात सादर केले आहे. ज्याचे तपशील आपण पुढे पाहू शकता.

  • डिस्प्ले: Vivo T3 5G मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस ॲमोलेड डिस्प्ले आहे. त्यावर 2400 x 1080 चे पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो.
  • प्रोसेसर: यात मीडियाटेक डायमेंसिटी 7200 चिपसेट लावण्यात आला आहे. हा 2.8Ghz ची उच्च क्लॉक स्पीड प्रदान करतो.
  • स्टोरेज आणि रॅम: मोबाईलमध्ये 8GB LPDDR4X रॅम + 256जीबी UFS2.2 इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. यासोबत 8GB टर्बो रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे.
  • कॅमेरा: Vivo T3 5G ट्रिपल कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. यात ओआयएस तंत्रज्ञान असलेला 50 मेगापिक्सेलचा सोनी IMX 882 प्रायमरी आणि 2 मेगापिक्सेल बोकेह आणि फ्लिकर सेन्सर लावण्यात आला आहे. त्याचवेळी, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल फ्रंट लेन्स आहे.
  • बॅटरी: स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 44 वॉट फास्ट चार्जिंग दिली गेली आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here