अत्यंत स्वस्तात 50MP Camera, 6GB RAM सह POCO M5 लाँच; रेडमी-रियलमीला मिळणार खरी टक्कर

POCO M5 launched in india with 50MP Camera MediaTek Helio G99 check price specifications sale discount offer details

Xiaomi चा sub-brad म्हणून बाजारात आलेल्या POCO नं स्वतंत्र ब्रँड बनवून चांगली लोकप्रियता मिळवली आहे. लो बजेट सेग्मेंटमध्ये पोको स्मार्टफोन लोकांना आवडत आहेत. स्वस्त मोबाइल फोन्सवर लक्ष केंद्रित करत पोकोनं आज नवीन POCO M5 स्मार्टफोन लाँच केला आहे जो 50MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G99 चिपसेट आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो.

POCO M5 Specification

पोको एम5 मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह बाजारात आली आहे. POCO M5 चे डायमेंशन 163.99 x 76.09 x 8.9एमएम आणि वजन 201ग्राम आहे. हा स्प्लॅश प्रूफ स्मार्टफोन आहे जो पाण्याचे शिंतोडे सहन करू शकतो. हे देखील वाचा: जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती

POCO M5 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली-जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. पोको एम5 Turbo RAM extension टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे रॅम पावर 2जीबी अतिरिक्त मिळवता येते.

पोको एम5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP ISOCELL JN1 सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला बॅक पॅनलवर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

POCO M5 launched in india with 50MP Camera MediaTek Helio G99 check price specifications sale discount offer details

POCO M5 ड्युअल सिम फोन आहे ज्यात 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी पोको एम5 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी मिळते. विशेष म्हणजे कंपनी फोनच्या बॉक्समध्ये 22.3वॉट फास्ट चार्जर देत आहे. हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा असलेला POCO चा 5G फोनवर शानदार डील; अत्यंत स्वस्तात खरेदी करा

POCO M5 price in India

POCO M5 ची किंमत 12,499 रुपयांपासून सुरु होते, ही फोनच्या 4GB+64GB व्हेरिएंटची किंमत आहे. तसेच 14,499 रुपयांमध्ये फोनचा 6GB+128GB मॉडेल विकत घेता येईल. हा पोको फोन येलो, आईसी ब्लू आणि पावर ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. येत्या 13 सप्टेंबरपासून हा फोन Flipkart Big Billion Day सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. लाँच ऑफर अंतर्गत ICICI आणि Axis बँकेच्या ग्राहकांना 1,500 रुपयांची सूट मिळेल. तसेच 1 वर्षाचे Disney+ Hotstar सब्सस्क्रिप्शन आणि 6 महिन्यांचे फ्री स्क्रीन प्रोटेक्शन देखील देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here