Categories: बातम्या

जियो ने एप्रिल महिन्यात जोडले 96 लाख सब्सक्राइबर्स, एयरटेल-वोडाफोन ला टाकले मागे

इंडियन टेलीकॉम इंडस्ट्री ची प्रतिस्पर्धा काही थांबवताना दिसत नाही. रिलायंस जियो, एयरटेल, वोडाफोन आणि आयडिया सोबत सरकारी कंपनी बीएसएनएल पण आपली स्थिति मजबूत करण्यात आणि जास्तीत जास्त कस्टमर्स जोडण्यासाठी स्वस्त प्लान्स आणि आकर्षक आॅफर्स घेऊन येत आहे. मागच्या काही आठवड्यांमध्ये या सर्व कंपन्यांनी नवीन प्लान सादर करण्या सोबतच जुने पॅक पण अपडेट केले आहेत. या बदलांनंतर कोणत्या कंपनीला सर्वात जास्त यूजर पसंत करत आहेत हे तर नाही माहित पण एप्रिल महिन्यात कोणत्या कंपनीची काय स्थिती होती यावर एक खुपच रोचक रिपोर्ट समोर आला आहे.

टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडिया ( ट्राई ) ने आपला नवीन रिपोर्ट सादर केला आहे ज्यात देशातील वेगवेगळ्या टेलीकॉम कंपन्यांच्या यूजर आणि सब्सक्राइबर्स चा लेखा जोखा आहे. हा रिपोर्ट एप्रिल महिन्याचा आहे आणि यात सांगण्यात आले आहे की कोणत्या कंपनी ने किती नवीन सब्सक्राइबर्स जोडले आहेत किंवा कोणत्या कंपनीला किती यूजर्स सोडून गेले आहेत.

रिपोर्ट नुसार एप्रिल महिन्यात जियो ची स्थिति जास्त मजबूत होती. एप्रिल महिन्यात जियो ने 96 लाख सब्सक्राइबर्स जोडले. ही संख्या कोणत्याही अन्य आॅपरेटर ने जोडलेल्या यूजर्स मध्ये सर्वात जास्त आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात जियो ने जोडलेल्या सब्सक्राइबर्स ची संख्या 94 लाख होती. या लिस्ट मध्ये आयडिया सेलुलर दूसरे स्थान मिळविण्यात यशस्वी झाली आहे एप्रिल महिन्यात आयडिया ने एकूण 55 लाख सब्सक्राइबर्स जोडले आहेत.

जियो ची कट्टर प्रतिस्पर्धी असणारी एयरटेल या लिस्ट मध्ये तिसर्‍या नंबर वर आली आहे. एयरटेल ने एप्रिल महिन्यात 45 लाख सब्सक्राइबर्स जोडले आहेत. सरकारी कंपनी बीएसएनएल ने 7 लाख पेक्षा जास्त सब्सक्राइबर्स जोडले असून वोडाफोन इंडिया ला 5 लाख सब्सक्राइबर्स चे नुकसान झाले आहे.

ट्राई च्या रिपोर्ट नुसार देशातील संयुक्त टेलीकॉम बाजार पाहता मार्च महीन्या पेक्षा एप्रिल महिन्यात सब्सक्राइबर्स च्या संख्येत घट झाली आहे. मार्च च्या शेवटी संपूर्ण देशात 120.62 कोटी सब्सक्रिप्शन मोजले गेले होते तर एप्रिल महिन्यात 4.85 टक्क्यांच्या घसरणी नंतर फक्त 114.71 लाख सब्सक्रिप्शन झाले आहेत.

देश के ब्रॉडबँड सेग्मेंट मध्ये पण रिलायंस जियो चे सर्वात जास्त सब्सक्राइबर्स आहे. जियो कडे 19.619 कोटी ब्रॉडबँड यूजर आहेत तर एयरटेल च्या ब्रॉडबँड सब्सक्राइबर्स ची संख्या 8.970 कोटी आहे. तसेच वोडाफोन च्या सब्सक्राइबर्स ची संख्या 5.991 कोटी आणि आइडिया कडे 4.241 कोटी ब्रॉडबँड सब्सक्राइबर्स आहेत.

Published by
Siddhesh Jadhav