OnePlus Nord 4 16 जुलैला होईल भारतात लाँच, यात मिळेल Metal Frame!

फ्लॅगशिप किलर नावाने फेमस टेक ब्रँड वनप्लस आपल्या ‘नोर्ड’ सीरीजचा नवीन आणि पावरफुल स्मार्टफोन OnePlus Nord 4 घेऊन येत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की हा येत्या 16 जुलैला OnePlus Summer Launch event चे आयोजन करणार आहे. या कार्यक्रमाच्या मंचावरून नॉर्ड 4 सादर होईल. वनप्लस लाँचची माहिती तसेच लीकचे स्पेसिफिकेशन तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus Nord 4 लाँचची तारीख

वनप्लस नॉर्ड 4 16 जुलैला OnePlus Summer Launch कार्यक्रमामध्ये लाँच होईल. हा एक ग्लोबल कार्यक्रम आहे ज्याचे आयोजन मिलान, इटली मध्ये केले जात आहे. या कार्यक्रमाच्या मंचावरून OnePlus Nord 4 भारतीय बाजारात येईल. 16 जुलैच्या सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी लाँच सुरु होईल ज्याला कंपनी वेबसाईटसह सर्व वनप्लस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह दाखवले जाईल.

OnePlus Nord 4 ची किंमत

लीकमध्ये समोर आले आहे ​कि वनप्लस नॉर्ड 4 5 जी फोनला 31,999 रुपयांमध्ये लाँच केले जाऊ शकते. या मोबाईलच्या बेस व्हेरिएंटची किंमत असू शकते. तसेच Nord 4 5G च्या सर्वात मोठ्या मेमरी व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपयांपर्यंत ठेवली जाऊ शकते.

OnePlus Nord 4 चे स्पेसिफिकेशन

  • 6.74-इंचाचा 120 हर्ट्झ ओएलइडी डिस्प्ले
  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 प्रोसेसर
  • 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज
  • 50 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
  • 16 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर
  • 5,500 एमएएच बॅटरी
  • 100 वॉट फास्ट चार्जिंग

डिस्प्ले : लीकनुसार या फोनमध्ये 6.74 इंचाची 1.5K ओएलईडी स्क्रीन दिली जाईल. OnePlus Nord 4 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 2150nits ब्राईटनेस आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फिचर्स मिळतील.

प्रोसेसर : OnePlus Nord 4 ला क्वॉलकॉमच्या 4 नॅनोमीटरवर बनलेला Snapdragon 7+ Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर लाँच केले जाऊ शकते जो 2.8GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करेल.

मेमरी : लीकनुसार हा मोबाईल 8GB RAM आणि 12GB RAM वर लाँच केला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोनमध्ये 128GB, 256GB तसेच 512GB स्टोरेज पाहायला मिळू शकते.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड 4 5 जी ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. यात OIS टेक्नॉलॉजी असलेला 50MP SONY LYT 600 मेन सेन्सर तसेच 8MP Ultra-wide IMX355 लेन्स मिळू शकतो.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे, व्हिडिओ कॉलिंग करणे तसेच रिल्स बनविण्यासाठी OnePlus Nord 4 मध्ये 16MP Front कॅमेरा दिला जाणार असल्याची चर्चा आहे. लीकनुसार हा Samsung S5K3P9 सेन्सर असेल.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी वनप्लस नॉर्ड 4 5 जी फोनला 5,500mAh battery वर लाँच केले जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here