Home टिप्स अँड ट्रिक्स जियोफोन वर व्हाट्सॅप झाला सुरू, लगेच करा आपल्या फोन मध्ये इंस्टाल, जाणून घ्या इथे

जियोफोन वर व्हाट्सॅप झाला सुरू, लगेच करा आपल्या फोन मध्ये इंस्टाल, जाणून घ्या इथे

जियोफोन देशातील सर्वात जास्त विकला जाणारा 4जी फीचर फोन आहे. रिलायंस जियो ने जेव्हा आपला हा फीचर फोन बाजारात आणला होता तेव्हा हा घेण्यासाठी मोबाईलच्या दुकानात लांबलचक रांगा लागल्या होत्या. गेल्या महिन्यात​ रिलायंस जियो चा जियोफोन 2 पण विक्री साठी उपलब्ध झाला आहे. जियोफोन 2 सोबतच कंपनी ने घोषणा केली आहे लवकरच जियोफोन वर इतर स्मार्टफोन्स प्रमाणे व्हाट्सॅप वापरता येईल. त्यानुसार आज आपल्या यूजर्सना भेट देत जियो ने जियोफोन वर व्हाट्सॅप सपोर्ट आणला आहे.

जियो ने जियोफोन वर व्हाट्सॅप सपोर्ट आणला आहे. म्हणजे आता जियोफोन यूजर्स पण आपल्या फीचर फोन जियोफोन मध्ये व्हाट्सॅप इंस्टाल करू शकतील आणि आपल्या मित्रांशी व्हाट्सॅप वर चॅटिंग करू शकतील. जियोफोन यूजर चॅटिंग सोबतच व्हाट्सॅप वर ईमेज व वीडियो पण शेयर करू शकतील. व्हाट्सॅप ने आईओएस आणि एंडरॉयड नंतर आता काईओएस आॅपरेटिंग सिस्टम वर पण अॅपचा नवीन वर्जन आणला आहे आणि जियोफोन पण काईओएस आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो.

जियोफोन मध्ये व्हाट्सॅप वापरण्यासाठी…

जियोफोन मधील जियो अॅप स्टोर वर जा आणि तो ओपन करा

जियो स्टोर मध्ये सोशल कॅटेगरी मध्ये तुम्हाला व्हाट्सॅप दिसेल, तिथे इंस्टाल चे बटन क्लिक करा

व्हाट्सॅप डाउनलोड झाल्यानंतर यात तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकावा लागेल जो ओटीपी नंतर व्हाट्सॅप एक्टिव करेल.

व्हाट्सॅप एक्टिवेट झाल्यावर तुम्ही तुमच्या जियोफोन मध्ये पण हा अॅप वापरू शकता आणि मित्रांशी चॅटिंग करू शकता.

विशेष म्हणजे जियो ने जियोफोन मध्ये व्हाट्सॅप अपडेट द्यायला सुरवात केली आहे पण संपूर्ण देशात हा अपडेट होण्यासाठी 10 दिवस लागतील. त्यामुळे जर तुमच्या ​जियोफोन च्या अॅप स्टोर मध्ये आता व्हाट्सॅप उपलब्ध नसल्यास, 20 सप्टेंबर पर्यंत हा अॅप तुम्हाला नक्की मिळेल.