Jio Vs Airtel: कोणाच्या 199 रुपयांचा प्लॅनमध्ये मिळत आहेत जास्त बेनिफिट्स, जाणून घ्या इथे

Airtel नं काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांना खुश करत नवीन आणि स्वस्त प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. हा प्लॅन 199 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. टेलिकॉम कंपनीच्या या नव्या रिचार्ज प्लॅनची खासियत म्हणजे Airtel 199 Plan मध्ये इतर प्लॅनप्रमाणे 24 किंवा 28 दिवसांची वॅलिडिटी दिली जात नाही तर यात संपूर्ण 30 दिवसांची वैधता मिळते. परंतु एयरटेल आव्हान देण्यासाठी जियोकडे याच किंमतीतील एक आधीपासून उपलब्ध आहे. Airtel 199 Plan ला Jio 199 Plan कडून टक्कर मिळत आहे. प्लॅनची किंमत एक आहे परंतु यात मिळणारे बेनिफिट्स खूप वेगळे आहेत. एकच किंमत असल्यामुळे आज आम्ही या आर्टिकलमध्ये एयरटेल आणि जियोच्या या दोन्ही प्लॅनची तुलना करण्याचा प्रयत्न करत आहोत, यातून तुम्हाला कोणता रिचार्ज प्लॅन बेस्ट आहे ते समजेल.

Airtel चा 199 रुपयांचा प्लॅन

डाटा: एयरटेलच्या 199 रुपयांच्या नवीन प्लॅन बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 3जीबी डेटा मिळतो. तसेच, डेटा लिमिट संपल्यावर 1MB डेटासाठी तुम्हाला 50 पैसे खर्च करावे लागतील. हा डेली डेटा देणारा प्लॅन नाही आहे.
वैधता आणि एसएमएस: या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 30 दिवसांची वैधता मिळते, जी या प्लॅनची खासियत आहे असं म्हणता येईल. तसेच प्लॅनमध्ये एकूण 300 फ्री एसएमएस मिळतात.
फ्री कॉलिंग: इतकेच नव्हे तर या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा देखील फायदा मिळेल. अ‍ॅडिशनल बेनिफिट पाहता रिचार्जमध्ये कॉलिंग, डेटा आणि एसएमएस व्यतिरिक्त फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्यूजिकचं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जात आहे.

Jio चा 199 रुपयांचा प्लॅन

डाटा: जियो के 199 रुपयांचा प्लॅनमध्ये कंपनी 1.5 जीबी डेटा डेली देत आहे. त्यामुळे, या रिचार्जमध्ये तुम्हाला एकूण 34.5 जीबी 4जी डेटा मिळेल.
वैधता आणि एसएमएस: या प्लॅनची वैधता 23 दिवस आहे. तसेच, कंपनी रोज तुम्हाला 100 एसएमएस देखील देते.
फ्री कॉलिंग: या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सर्व्हिस मिळते, तसेच कंपनी जियो अ‍ॅप्सचा फ्री सब्सक्रिप्शन देखील ऑफर करते.

Note: जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर तुमच्यासाठी Jio 199 Plan योग्य ठरेल. परंतु Airtel 199 च्या तुलनेत 6 दिवस कमी वॅलिडिटी मिळेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here