4,000एमएएच बॅटरी, 3जीबी रॅम आणि 5.99-इंचाच्या बेजल लेस डिसप्ले वर लॉन्च झाला कल्ट इम्पल्स, किंमत 8,999 रुपये

कल्ट बियॉन्ड, ग्लॅडीएटर आणि एम्बिशन सारखे स्मार्टफोन भारतात आणणारी टेक कंपनी कल्ट ने आज देशात आपला अजून एक स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कल्ट कडून ‘इम्पल्स’ स्मार्टफोन बाजारात आला आहे जो 8,999 रुपयांच्या किंमतीत आॅनलाईन व आॅफलाईन प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल. कल्ट इम्पल्स च्या खरेदी वर जियो कस्टमर्सना आॅफर अंतर्गत 2,000 रुपयांचा कॅशबॅक पण मिळवू शकतात.

कल्ट इम्पल्स च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.99-इंचाच्या एचडी+ ट्रूव्यू डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 7.1.1 नुगट आधारित आहे जो 1.5गीगाहर्ट्ज़ क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-टी720 जीपीयू आहे.

कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी ची रॅम मेमरी दिली आहे. फोन ची इंटरनल स्टोरेज 32जीबी ची आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 64जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी पण या फोन मध्ये सेल्फी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कल्ट इम्पल्स एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत तसेच याच्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप च्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कल्ट इम्पल्स फेस अनलॉक टेक्निक ला पण सपोर्ट करतो तसेच ओटीजी सपोर्ट सह या फोन मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कल्ट इम्पल्स 8,999 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. पण जियो च्या ऑफर मुळे या फोन ची प्रभावी किंमत 6,999 रुपये होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here