फक्त 499 रुपयांमध्ये करा बुक; 115Km च्या जबरदस्त रेंजसह आली BGAUSS BG D15 इलेक्ट्रिक स्कूटर

BGAUSS BG D15 Electric Scooter: BGAUSS नं आपल्या डीलर पार्टनर Ewings Automobile Pvt Ltd सोबत मिळून आपली तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर BG D15 लाँच केली आहे. BG D15 इलेक्ट्रिक स्कूटरची खासियत म्हणजे यात 20 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीनं दोन इलेक्ट्रिक स्कूटर BGAUSS BG D15 आणि BGAUSS BG D15 Pro सादर केल्या आहेत. फुल चार्जमध्ये या स्कूटर्स 115km पर्यंतची जबरदस्त रेंज देतात.

BGAUSS BG D15 Electric Scooter

BG D15 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 3.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकचा वापर केला आहे. ही स्पोर्ट्स मोडमध्ये फक्त 7 सेकंदात 0-60 km ताशी वेग गाठू शकते. BG D15 मध्ये दोन राइड मोड्स देण्यात आले आहेत, जे Eco आणि Sport असे आहेत. यात तुम्हाला 16 इंचाचे अलॉय व्हील मिळतात. हिची बॅटरी 5 तास 30 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. D15 ची ARAI-सर्टिफाइड रेंज 115 km आहे. हे देखील वाचा: 12GB दणकट रॅमसह स्वस्त 5जी फोन Vivo S16e लाँच; डिस्प्लेपासून चार्जिंगपर्यंत सर्वकाही टिपटॉप

20 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स

BG D15 प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरच्या लुक्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीनं यात आधुनिक डिजाइन दिली आहे, स्मार्ट बॅटरी आणि मोटर कंट्रोलर सारखे उपयुक्त फीचर्स देण्यात आले आहेत. BG D15 IP67 रेटेड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरीसह पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे, ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून स्कूटरचा बचाव होतो.

BG D15 इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमधील अशी पहिली स्कूटर आहे ज्यात युजर्सना 20 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देखील मिळतात. यात लेटेस्ट इंटेलिजंट कनेक्टिव्हिटी फीचरच्या मदतीनं आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी कनेक्ट होऊ शकता. BG D15 मध्ये रिमूव्हेबल बॅटरी, इन-बिल्ट नेव्हिगेशन, डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस स्टार्ट, मोबाइल चार्जिंगसाठी USB पोर्ट, कॉल आणि नोटिफिकेशन अलर्ट सारखे फीचर्स आहेत. हे देखील वाचा: चकाचक सेल्फीसाठी 50MP कॅमेऱ्यासह Vivo S16 Pro आणि Vivo S16 लाँच; रॅम देखील मिळतोय मजबूत

BGAUSS BG D15 ची किंमत

BGAUSS BG D15 सीरीजच्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत पाहता, D15i ची किंमत 99,999 रुपये आणि D15 Pro ची किंमत 1,14,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. विशेष म्हणजे बिगास आपल्या ग्राहकांना लाइफटाइमला सपोर्ट देईल आणि ग्राहकांना एक्सक्लूसिव्ह अ‍ॅन्युअल मेंटेनंस सपोर्ट, मोबाइल अ‍ॅप सपोर्ट, रोडसाइड असिस्टंट आणि पिक अँड ड्रॉपचा पर्याय देखील मिळेल. ग्राहक https://www.bgauss.com/book-now/च्या माध्यमातून ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात, कंपनीनं याची बुकिंग अमाउंट सध्या 499 रुपये ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here