Categories: बातम्या

देशी स्मार्टफोन कंपनी लवकरच सादर करेल महिलांसाठी खास मोबाईल, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

91मोबाईल्सला एक्सक्लूसिवली अशी माहिती मिळाली आहे कि या दिवाळीत देशी स्मार्टफोन कंपनी Lava महिलांसाठी एक खास मोबाईल Lava BE U लॉन्च करणार आहे. महिलांना लक्षात ठेऊन या फोन मध्ये स्पेसिफिकेशन्स दिले जातील. डिजाइन मध्ये महिलांच्या आवडी निवडीची काळजी घेतली जाईल. अजूनतरी आम्हाला या फोनच्या लॉन्च डेटची माहिती मिळाली नाही. पण बोलले जात आहे कि नोव्हेंबरच्या आधी किंवा दुसऱ्या आठवड्यात हा लॉन्च केला जाईल.

आम्हाला मिळालेल्या माहिती मध्ये फोनच्या डिजाइन संबंधित डीटेल समोर आले आहेत, जो पिंक कलर मध्ये आहे आणि याचा रियर लुक खूप आकर्षक आहे. फोनच्या रियर पॅनल रिमूवेबल आहे. तसेच खाली डावीकडे स्पीकरसाठी कट-आउट आहे. लावा बीई यू डिजाइन मध्ये डिस्प्लेच्या खाली एक मोठा चिन पार्ट आहे.

हे देखील वाचा : Lava ने आणला जगातील पहिला तापमान मोजणारा फोन, स्पर्श न करता बॉडी टेंपरेचर दाखवेल हा स्वस्त इंडियन मोबाईल

Lava BE U च्या किंमतीची आम्हाला अजूनतरी कोणतीही माहिती मिळाली नाही. पण डिजाइन बघून असे म्हणता येईल कि फोन बजेट कॅटेगरी मध्ये सादर केला जाईल, ज्यामुळे याची किंमत 10,000 रुपयांच्या आत असेल. यावर्षी सप्टेंबर मध्ये एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात सांगण्यात आले होते कि लावा भारतात अनेक फोन्स सादर करण्याचे प्लानिंग करत आहे, ज्यांची किंमत 10,000 रुपयांच्या आस-पासच असेल.

लावाने त्या रिपोर्ट मध्ये आगामी स्मार्टफोन्सची नावे सांगितली नव्हती. रिपोर्टनुसार लावाने दावा केला होता कि हे सर्व स्मार्टफोन पूर्णपणे मेक इन इंडिया असतील आणि यांची निर्मिती भारतातच केली जाईल. Lava Mobiles चे हे आगामी स्मार्टफोन्स Xiaomi, Realme, Tecno, Infinix सोबतच लो बजेट मध्ये Samsung आणि Vivo ला पण चांगली टक्कर देतील.

हे देखील वाचा : Samsung ने केली चीनी कंपन्यांची सुट्टी, Lava पण बनला भारतीयांच्या आवडीचा मोबाईल ब्रँड

LAVA Z66

लावा मोबाईल्सने काही दिवसांपूर्वीच हा ‘मेड इन इंडिया’ फोन फक्त 7,777 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.08 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला आहे. कंपनीने LAVA Z66 डिस्प्ले 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे.

Published by
Siddhesh Jadhav