Categories: बातम्या

Lava ने आणला स्वस्त घडी होणारा फोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava एक नवीन आणि शानदार फोन घेऊन आली आहे. हा फोन कंपनीने लावा फ्लिप नावाने सादर केला आहे जो फ्लिप फीचर फोन आहे. लावाचा हा नवीन फीचर फोन लावा फ्लिप खूप कमी किंमतीत लॉन्च केला गेला आहे, जी हा फ्लिप फोन आवडणाऱ्या लोकांसाठी या फेस्टिव सीजनची बेस्ट डील म्हणता येईल.

लुक

लावा फ्लिप की सर्वात खास बाब म्हणजे याचा लुक आहे. डिवाइस लाल आणि निळ्या रंगात लॉन्च केला गेला आहे जे खूप आकर्षक आहेत. फोन मध्ये बॉडी सोबतच कीपॅड पण त्याच कलरचा आहे. यात कॅमेरा सेटअप पण देण्यात आला आहे, ज्यामुळे लुक अजून खुलतो.

हे देखील वाचा : Lava ने आणला जगातील पहिला तापमान मोजणारा फोन, स्पर्श न करता बॉडी टेंपरेचर दाखवेल हा स्वस्त इंडियन मोबाईल

22 भाषांचा सपोर्ट

लावा फ्लिपची एक खासियत अशी आहे कि यात हिंदी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, बंगाली, तामिळ, तेलुगू आणि कन्नड समवेत 22 भारतीय भाषांमध्ये मेसेज पाठवता येतील. तसेच फोन मध्ये टॉर्च, वायरलेस एफएम आणि नंबर टॉकर सारखे फीचर्स पण आहेत. इतकेच नव्हे तर फोन सोबत एक वारसाची रिप्लेसमेंट वॉरंटी पण दिली जात आहे.

स्पेसिफिकेशन्स

Lava Flip मध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले लगा आहे आणि याची बॉडी पोलीकार्बोनेटची आहे. डुअल सिम सपोर्ट असलेल्या या फोन मध्ये 1200 mAh ची बॅटरी आहे, जी कंपनी नुसार सिंगल चार्ज वर 3 दिवस चालू शकते. या फोनची मेमरी 32 जीबी पर्यंत एक्सपांडेबल स्टोरेज आहे. लावा फ्लिप मध्ये वीजीए कॅमेऱ्यासह ब्लिंक कॉल नोटिफिकेशन एलईडी पण आहे.

किंमत आणि उपलब्धता

लावा फ्लिप 1,640 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. फोन Red आणि Blue कलर मध्ये सादर केला गेला आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाले तर याची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट, अमेझॉन सोबतच रिटेल स्टोर वर पण लवकरच विक्री सुरु होईल. पण सेल डेट बद्दल सध्या माहिती समोर आली नाही.

Published by
Siddhesh Jadhav